Advertisement

यवतमाळ जिल्ह्यातील ITI संस्थांचा आढावा बैठक संपन्न Dual VET Tata STRIVE, Industry Meet व OJT महारोजगार वाढीवर भर

  यवतमाळ जिल्ह्यातील ITI संस्थांचा आढावा बैठक संपन्न Dual VET Tata STRIVE, Industry Meet व OJT महारोजगार वाढीवर भर

बाभूळगाव यवतमाळ, दिनांक 16 ऑक्टोबर 2026 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बाभुळगाव येथे जिल्ह्यातील सर्व ITI संस्था, DVETO यवतमाळ तसेच Dual VET आणि Tata STRIVE उपक्रमाशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचेवतीने मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील ITI संस्थांचा आढावा बैठक संपन्न Dual VET Tata STRIVE, Industry Meet व OJT महारोजगार वाढीवर भर

व्यासपिठावर श्री महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ,श्री.संजय तेलतुंबडे प्राचार्य आयटीआय वणी,श्री.सचिन कराळे समन्वयक टाटा स्ट्राव्ह,श्री.विशाल मिलमिले प्राचार्य आयटीआय बाभुळगाव उपस्थित होते.

या बैठकीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, उद्योगांशी समन्वय वाढविणे आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख विषय

1. Industry Meet आयोजित करणे

जिल्ह्यातील सर्व ITI संस्थांनी स्थानिक औद्योगिक आस्थापना, कंपन्या आणि उद्योग प्रतिनिधींशी समन्वय साधून Industry Meet आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण देणे आणि ITI व उद्योग यांच्यातील सहकार्य वाढविणे यावर भर देण्यात आला.

2. Dual VET आणि Tata STRIVE उपक्रमाचा आढावा

Dual VET तसेच Tata STRIVE संबंधित उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव मिळावा, त्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे आणि रोजगारक्षम कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली.

3. OJT (On-the-Job Training) वाढविणे

ITI विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी On-the-Job Training (OJT) च्या संधी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. अधिकाधिक विद्यार्थ्यांना संबंधित उद्योगांमध्ये प्रशिक्षण मिळावे, यासाठी संस्थांनी उद्योगांशी संपर्क वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

4. Craft Instructor यांचे Pedagogy Training

प्रशिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करण्यासाठी Craft Instructor यांचे Pedagogy Training आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आधुनिक अध्यापन पद्धती, प्रभावी प्रशिक्षण तंत्रे आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला.

5. विद्यार्थ्यांसाठी Placement संधी

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी Placement Drive, रोजगार मेळावे आणि उद्योगांशी समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना उद्योगांच्या आवश्यकतेनुसार तयार करणे हे या उपक्रमांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

6. Industry Interaction वाढविणे

ITI संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी Industry Interaction आयोजित करण्यावर भर देण्यात आला. उद्योग प्रतिनिधींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक कौशल्ये, औद्योगिक गरजा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

ITI प्रशिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न

सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता ITI विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आधुनिक तांत्रिक कौशल्ये आणि उद्योगांशी संपर्क मिळणे आवश्यक आहे. Industry Meet, OJT, Pedagogy Training, Placement आणि Industry Interaction या माध्यमांतून प्रशिक्षण अधिक परिणामकारक व रोजगाराभिमुख करण्यास मदत होईल.

यवतमाळ जिल्ह्यातील ITI संस्थांचा आढावा बैठक संपन्न Dual VET Tata STRIVE, Industry Meet व OJT महारोजगार वाढीवर भर

या आढावा बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, प्रभारी प्राचार्य, गटनिदेशक,भांडारपाल, लिपिक वर्ग उपस्थित होते.श्री सचिन कराळे यांनी पीपीटी व्दारे उपस्थितांना माहिती दिली

यवतमाळ जिल्ह्यातील ITI संस्थांचा आढावा बैठक संपन्न Dual VET Tata STRIVE, Industry Meet व OJT महारोजगार वाढीवर भर

आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा

आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.

🌐 Website: www.nkrathod.in
📘 Facebook: fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X): @nkrathod_in
📸 Instagram: @nkrathod.in
📢 Telegram: t.me/itiupdate
▶️ YouTube: YouTube Channel

✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना
📢 ITI संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा!

Post a Comment

0 Comments