Advertisement

ABOUT ME

ओद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये अध्यापणाचे  कार्य करीत असताना प्रशिक्षणार्थ्यांना उपयोगी पडेल अश्या स्वरुपाच्या साइट ची निर्मिती करावी ही माझी मनस्वी इच्छा होती. तसेच वेगळे पणा करण्याची नेहमीच माझी धड-पड असते. विद्यार्थी हा आयटीआय चे प्रशिक्षण पूर्णा करता परंतु पुढे काय करायचे हे त्याला पुरेपूर महिती नसते. एकदा पास झाले की मग त्याच्या पुढे रोजगारा चा  प्रश्न निर्माण होतो. त्या वेळी त्याला खरी मार्गदर्शनाची गरज असते.
         
         आजच्या युगाला  Technology/तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते परंतु सर्व सोई उपलब्ध असून नेमके सर्च करायचे हा प्रश्न पडतो. जवळपास बर्‍याच प्रशिक्षणार्थी जवळ Android Mobile असतोच नाही तो कुठे न कुठे social site ला connected असतो. ह्याचा विचार  करून सर्वप्रथम मी यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव आयटीआय दारव्हा करिता facebook पेज तयार केला आणि त्यावर प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT  प्रमाणपत्र  बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती मी टाकू लागलो. सुरूवाती पासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि बघता बघता 636 followers झाले आणी बर्‍याच प्रशिक्षणार्थ्यांना त्याचा लाभ झाला आन्ही होत आहे. परंतु आता हा पेज सर्वां करिता नव्या रूपाने I.T.I Job News  तयार केला आहे.

        बर्‍याच दिवसा पासून माझ्या मनात कल्पना येत होती. परंतु कोणाचे ही मार्गदर्शन मिळत नव्हते, मनातून तर खुबच इच्छा होती की स्व्ताची website असावी त्यावर प्रशिक्षणार्थ्यांचे  हिताचे गोष्टी असावेत. त्या साठी माझा मुलगा नचिकेत राठोड माला प्रेरित करीत होता. बाबा तुमचे Wireman व्यवसायचे website तयार करा आणि नवनवीन माहिती टाका असे म्हणत होता. शेवटी त्याच्या संकल्पनेतून माझे वेबसाइट बनविण्याची इच्छा पूर्ण झाली.
या site वरुण आयटीआय मधील राबविल्या जाणार्‍या वेगवेगळ्या प्रकार चे उपक्रम प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT  प्रमाणपत्र  बाबत माहिती,रोजगार व स्वयं रोजगार माहिती आणी आयटीआय मधील  मिळणार्‍या प्रशिक्षनाची माहिती जनसामान्य मानसा पर्यन्त पोहोचावी हाच उद्धिष्ट  ठेवून एक पाऊल ठेवला आहे.

धन्यवाद... 


                    एन. के. राठोड 
                   (शि. नि. तारतंत्री) 
    आय.टी.आय दारव्हा  जि. यवतमाळ 
Email- Contactnkrathod@gmail.com

                            
आम्ही फक्त वेबसाइट वरच नसून इतर सोशल मीडिया वर सुद्धा काम करतो तर तुम्ही आम्हाला तिकडे पण Follow करू शकता. त्यांची links तुम्हाला खाली दिलेली आहे तर आम्हाला नक्कीच फॉलो करा...
Website - https://www.nkrathod.inYouTube- https://www.youtube.com/nkrathod