Advertisement

अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ; यवतमाळ ITI मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

 बाबाजी दाते शासकीय ITI यवतमाळ येथे अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा आभासी पद्धतीने शुभारंभ!

Yavatmal ITI Sant Rohidas Short Term Skill Training Courses Launch 2026

यवतमाळ | २३ नोव्हेंबर २०२६


राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा राज्यस्तरीय शुभारंभ सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑनलाइन (आभासी) पद्धतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), यवतमाळ येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संत रोहिदास अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ; यवतमाळ ITI मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन

या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन (आभासी) माध्यमातून करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मा. श्री. ॲड. मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, आयुक्त मा. श्री. अमित सैनी तसेच संचालक मा. श्री. सतीश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून संत रोहिदास अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची घोषणा

यावेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मा. श्री. ॲड. मंगल प्रभात लोढा यांनी आभासी माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवकांनी बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

याच कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी “संत रोहिदास अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम” अशी घोषणा केली. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

संत रोहिदास अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण

युवकांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाची नवी संधी!

बाबाजी दाते शासकीय ITI यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन

राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथेही संत रोहिदास अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. महेशकुमार दयानंद सिडाम, गटनिदेशक श्री. लीलाधर दांदडे, श्री. शैलेश शिरभाते, श्री. किशोर मुनगिनवार, सर्व शिल्पनिदेशक, कर्मचारीवृंद आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ; यवतमाळ ITI मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

युवकांसाठी कौशल्य विकासाची नवी संधी

आजच्या बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे झाले आहे. अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून युवकांना कमी कालावधीत आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामुळे युवकांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योग क्षेत्रातील विविध संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल. तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल.

कौशल्य प्रशिक्षणातून सक्षम युवक आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!

आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा

आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.

🌐 Website: www.nkrathod.in
📘 Facebook: fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X): @nkrathod_in
📸 Instagram: @nkrathod.in
📢 Telegram: t.me/itiupdate
▶️ YouTube: YouTube Channel

✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना
📢 ITI संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा!

Post a Comment

0 Comments