Advertisement

यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!

यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!

यवतमाळ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) निदेशकांची अध्यापन कौशल्ये विकसित करून प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावी, कौशल्याधारित आणि उद्योगाभिमुख करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात आयोजित पाच दिवसीय Pedagogy Training Programme चा पहिला बॅच यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील एकूण ३३ निदेशकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यामध्ये यांत्रिक मोटर गाडी, वेल्डर, वीजतंत्री, फिटर, या व्यवसायातील जिल्ह्यातील  शिल्पनिदेशकांना याचा लाभ झाला

वरिष्ठ स्तरावरील मार्गदर्शन व प्रेरणेतून प्रशिक्षणाचे आयोजन

सदर पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन माननीय मंत्री महोदय, अपर मुख्य सचिव महोदया, संचालक महोदय, सहसंचालक तसेच Dual VET, Tata STRIVE आणि Siemens कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्याने करण्यात आले.

या प्रशिक्षण उपक्रमाच्या नियोजनासाठी व यशस्वी अंमलबजावणीसाठी श्री. महेशकुमार दयानंद सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभले.

Inquiry-Based Learning आणि Project-Based Learning वर विशेष मार्गदर्शन

या प्रशिक्षण सत्रामध्ये मास्टर ट्रेनर श्री. शुभम खरात यांनी Inquiry-Based Learning (IBL) आणि Project-Based Learning (PJBL) या आधुनिक अध्यापन पद्धतींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता, चिकित्सक विचार, समस्या निराकरण कौशल्य आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी या पद्धती कशा उपयुक्त ठरतात, याचे स्पष्टीकरण विविध उदाहरणे, समूह उपक्रम आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करण्यात आले.

निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रशिक्षणादरम्यान सर्व ३३ निदेशकांनी समूह कृती, चर्चासत्रे आणि विविध प्रात्यक्षिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. आधुनिक अध्यापन तंत्रांचा प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रक्रियेत उपयोग कसा करता येईल, यावर सहभागी निदेशकांनी विचारमंथन केले.

श्री. महेशकुमार दयानंद सिडाम यांचे मार्गदर्शन

याप्रसंगी श्री. महेशकुमार दयानंद सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांनी उपस्थित निदेशकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेल्या आधुनिक अध्यापन पद्धतींची प्रत्यक्ष वर्गात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित व उद्योगाभिमुख प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गुणवत्तापूर्ण ITI प्रशिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

Pedagogy Training Programme च्या माध्यमातून निदेशकांच्या अध्यापन कौशल्यांमध्ये सुधारणा होऊन ITI मधील प्रशिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, कृतीशील आणि उद्योगांच्या गरजांशी सुसंगत होण्यास मदत होणार आहे.

या प्रशिक्षण सत्राचे प्रभावी मार्गदर्शन केल्याबद्दल मास्टर ट्रेनर श्री. शुभम खरात यांचे तसेच उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व ३३ निदेशकांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि कुशल मनुष्यबळ निर्मिती हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

श्री. महेशकुमार दयानंद सिडाम

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ.


📌 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा

आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.

🌐 Website: www.nkrathod.in
📘 Facebook: fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X): @nkrathod_in
📸 Instagram: @nkrathod.in
📢 Telegram: t.me/itiupdate
▶️ YouTube: YouTube Channel

✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

  • ✔ ITI प्रवेश माहिती
  • ✔ परीक्षा व निकाल अपडेट
  • ✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
  • ✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
  • ✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
  • ✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना
📢 ITI संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा!


यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!
यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!
यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!
यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!
यवतमाळ जिल्ह्यात Pedagogy Training Programme चा पहिली बॅच यशस्वीरीत्या संपन्न; ३३ निदेशकांचा उत्स्फूर्त सहभाग!
Pedagogy Training Yavatmal Pedagogy Training Yavatmal ITI Instructor Training ITI Training Programme Yavatmal ITI Training Pedagogy Training Group Photo
1 / 6

Post a Comment

0 Comments