आयटीआय उस्मानाबाद येथील मयूर मोरे यांची विदेशात स्विझरलँड येथे Jaguar land Rover कंपनीमध्ये निवड
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद विभाग औरंगाबाद येथील ट्रेड फिटर पास मयूर अशोक मोरे यांचे थेट स्विझरलँड येथे विदेशात 12 लाख 24000 हजार पॅकेज वर स्विझरलँड येथे निवड झालेली आहे
मयूर अशोक मोरे हा जरंडी तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी असून फक्त 10 वी आणि आयटीआय फिटर पास आहे.दहावी मध्ये शिकत असताना त्याला आयटीआय मध्ये फिटर ट्रेड करावा अशी त्याची इच्छा होती .सन 2018 मध्ये ऑनलाइन अर्ज केला आणि आयटीआय उस्मानाबाद मध्ये नंबर लागले .आणि 2018-2020 मध्ये आयटीआय फिटर करून जुलै 2020 मध्ये चांगल्या मार्काने पास झाला .तो अतिशय गरीब कुटुंबातील असून वडील सोयगाव येथे .फर्निचर काम करतात.
त्यानंतर 2020 मध्ये चौधरी सर यांचा मार्गदर्शनात टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल मध्ये पिंपरी चिंचवड येथे शिकाऊ उमेदवार अप्रेंटीशिप 2021 मध्ये पूर्ण केले आणि त्याठिकाणी 75 % गुण घेऊन पास झाला आणि त्याच कंपनीमध्ये नोकरीला लागला .
स्विझरलँड येथे Jaguar land Rover कंपनीमध्ये टेक्निशियन पदाकरिता जागा निघाल्या होते तर मयूर यांनी फॉर्म भरला होता तर तो टेक्निशियन पदाकरिता परिक्षा दिली होती आणि त्यामध्ये तो पास झाला आणि मुलाखतीमध्ये पण पास झाला. स्विझरलँड येथील Jaguar land Rover कंपनीमध्ये त्याची निवड झाली . आयटीआय पास करीता विदेशात अतिशय सुवर्णसंधी असून महाराष्ट्र राज्यातून ट्रेड फिटरचा मयूर मोरे हा पहिलाच स्वित्झर्लंड मध्ये जाणारा प्रशिक्षणाची ठरलेला आहे
मयूर ला दर महिना एक लाख दोन हजार रुपये पगार मिळणार आहे. मयूर हा कुटुंबात मोठा असून त्याचे लहान भाऊ हे बी.ए.प्रथम वर्षाला शिकत आहे.आणि आई गृहिणी आहे .स्विझरलँड येथे त्याची निवड झाल्याने त्याच्या कुटुंबामध्ये दिवाळी सणासारखे आनंद झाले तर त्याच्या मित्राने फटाके फोडून आनंद साजरा केला मयूर हा 16 मार्च 2023 ला स्वित्झर्लंड मध्ये विमानाने रवाना होणार आहे.
मयूर मोरे याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे याप्रसंगी प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री प्रवीण जी अवताडे साहेब, माननीय उपसंचालक श्री रविशंकर सावळे साहेब, तसेच सहसंचालक श्री सतीश सूर्यवंशी साहेब यांनी शिल्प निर्देशक निदेशक जोडारी श्री चौधरी एम ए व प्रशिक्षणार्थी मयूर मोरे यांचे अभिनंदन केले.
मयूर हा त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई बाबा आणि त्याचे प्रशिक्षक श्री.मनोज अरविंद चौधरी (शिल्पनिदेशक फिटर) यांना देत आहे.
![]() |
| प्रशिक्षक श्री.मनोज अरविंद चौधरी (शिल्पनिदेशक फिटर) |
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

.webp)

0 Comments