आयटीआय पांढरकवडा येथील रोजगार भरती मेळाव्यात ४८ प्रशिक्षणार्थ्यांची देशातील नामांकित ट्रॅक्टर्स महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नागपूर मध्ये निवड
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे 21 सप्टेंबर रोजी महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर करिता रोजगार भरती मिळव्याचे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य आयटीआय पांढरकवडा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मंगला मडावी तसेच त्यांचे एन.के. राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. आणि कंपनीचे एच आर श्री. संजय अग्रवाल उपस्थित होते याप्रसंगी संस्थेच्या वतीने त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आणि दिप प्रज्वलाने भरती मेळाव्याचे सुरुवात झाली.
श्री संजय अग्रवाल नागपूर यांनी देशातील नामांकित ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचा संपूर्ण 48 देशांमध्ये विस्तार असलेल्या सांगून कंपनीमध्ये असलेली सुविधा, कंपनीचे नियम व अटी सुरक्षितता, आरोग्य, हायजेनिक जेवण नाश्ता याबाबत सगळे माहिती देऊन प्रोजेक्टर द्वारे विस्तृत माहिती दिली. त्यानंतर उपस्थित उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीत एकूण 75 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते त्यापैकी 48 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीचे संस्थेचे प्राचार्य श्री गजानन राजुरकर यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोजगार मिळावा चे प्रास्ताविक श्री गणेश देठे यांनी केले.
भरती मेळावा करिता विशेष परिश्रम श्री किरण आत्राम, श्री ज्ञानेश्वर आत्राम, श्री आकाश सोनवणे, श्री शैलेश चव्हाण, जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी केले. या रोजगार मेळावा चे सूत्रसंचालन श्री किरण वसंतराव राठोड यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्री .एन .के .राठोड यांनी केले .या भरती मेळाव्यात बहुसंख्येने संस्थेतील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram-https://t.me/itiupda.
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments