Advertisement

शासकीय आयटीआय आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ – ऑनलाइन प्रवेश 21 में २०२६ पासून प्रक्रिया सुरू

 शासकीय आय.टी.आय. आदिवासी पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ – ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2026 सुरू 

शासकीय आय.टी.आय. (आदिवासी) पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथे विविध ट्रेड्ससाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

या संस्थेमध्ये 10वी पास तसेच काही ट्रेड्ससाठी 10वी नापास विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.


शासकीय आयटीआय आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ – ऑनलाइन प्रवेश 21 में २०२६ पासून  प्रक्रिया सुरू



📢 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र ITI प्रवेश 2026 अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर अर्ज करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.


🏫 उपलब्ध ट्रेड्स व जागांची माहिती

अ.क्र.ट्रेडजागाशैक्षणिक अर्हता
1बेसिक कॉस्मेटोलॉजी2410वी पास
2विजतंत्री2010वी पास
3फॅशन डिझाइनिंग & टेक्नॉलॉजी2010वी पास
4इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल2010वी पास
5मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स2010वी पास
6मेकॅनिक डिझेल4810वी पास
7यांत्रिक मोटर गाडी2410वी पास
8सुईंग टेक्नॉलॉजी2010वी पास / नापास
9टेक्स्टाईल वेट प्रॉसेसिंग टेक्निशियन2010वी पास
10विविंग टेक्निशियन2410वी पास
11वेल्डर4010वी पास / नापास
12फीटर2010वी पास
13वायरमन2010वी पास / नापास
14      स्पिनिग टेक्निशियन                                       20      10वी पास

एकूण उपलब्ध जागा

🏫 एकूण जागा – 324


📌 प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती

✅ प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे
✅ प्रवेश गुणवत्तेनुसार दिला जाणार
✅ काही ट्रेडसाठी 10वी नापास विद्यार्थ्यांनाही संधी
✅ अर्ज केल्यानंतर Confirmation आवश्यक असू शकते
✅ Document Verification वेळेत पूर्ण करणे आवश्यक


🎓 आयटीआय मधील विशेष सुविधा

शासकीय आय.टी.आय. (आदिवासी) पांढरकवडा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, आर्थिक व रोजगाराभिमुख सुविधा उपलब्ध आहेत.

उपलब्ध सुविधा 👇

✅ एकूण 14 विविध ट्रेड्स उपलब्ध

✅ अनुसूचित जमाती (ST) प्रशिक्षणार्थींना दरमहा ₹1000 विद्यावेतन

✅ समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती सुविधा

✅ MahaDBT Portal वर अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ

✅ ST विद्यार्थ्यांना एसटी बस पास सवलत

✅ सुसज्ज व आधुनिक वर्कशॉप सुविधा

✅ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

✅ विद्यार्थ्यांसाठी Hostel सुविधा उपलब्ध

✅ रोजगार व स्वयंरोजगार भरती मेळावे आयोजित

✅ प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या उत्तम संधी

✅ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी NSP Scholarship सुविधा

✅ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन


🤔 ITI का निवडावे?

✔ कमी फीमध्ये तांत्रिक शिक्षण
✔ कमी कालावधीत कोर्स पूर्ण
✔ Apprenticeship व नोकरीच्या संधी
✔ सरकारी व खाजगी क्षेत्रात मोठी मागणी
✔ स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय


🌐 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक

📝 Maharashtra ITI Admission Portal
👉 https://admission.dvet.gov.in


📢 अधिक माहितीसाठी संपर्क

🌐 Website
https://www.nkrathod.in

📘 Facebook
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X)
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel
https://t.me/itiupdate

▶️ YouTube
https://www.youtube.com/nkrathod

श्री.व्ही.व्ही.थोटे प्राचार्य 

विर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा

शासकीय आय.टी.आय. (आदिवासी) पांढरकवडा ही विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी उत्कृष्ट संस्था आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि अधिकृत वेबसाइटवरील अपडेट्स नियमित तपासत राहावेत.

🎯 “कौशल्य शिका – उज्ज्वल भविष्य घडवा!”


Post a Comment

0 Comments