आरटीआय तारतंत्री पास झाल्यानंतर इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून आपण स्वयंरोजगार करू शकता .
महाराष्ट्र मध्ये एकूण 417 शासकीय आयटीआय आहेत. बहुतेक करून जास्तीत जास्त आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशन वीजतंत्री किंवा वायरमन तारतंत्री ह्या व्यवसायाकडे कल असते प्रवेशासाठी कोणताही प्रशिक्षणार्थी आला की तो वीजतंत्री आहे का वायरमन मध्ये जागा खाली आहे का असे विचारतो तसेच महाराष्ट्रामध्ये खाजगी आयटीआय मध्ये जास्त करून वीजतंत्री हा व्यवसाय आहे परंतु शासकीय आयटीआय मध्ये नाममात्र फी असते
्आयटीआय मध्ये आय एम सी च्या चार जागा पैसे भरून सिट असते. तरी विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेतात त्यामुळे पहिल्याच फेरीत पन्नास टक्के जागा भरून जातात उर्वरित पन्नास टक्के जागाही ही तिसऱ्या फेरीपर्यंत पूर्ण होतात आयटीआय पास केल्यानंतर कोणती नोकरी लागते काहीच माहिती नसते आयटीआय झाल्यानंतर काय करावे लागते हे माहीत नसते .
तरी ओढ असते या दोन व्यवसायात प्रवेश घेण्याची तसे बघितले तर आयटीआयच्या कोणता ट्रेड कमजोर नाही कोणताही ट्रेड केला तर रोजगार व स्वयंरोजगार हमखास आहेत तरीपण इलेक्ट्रिशियन वायरमन बरोबरच इतर सगळे ट्रेड ला सारखेच रोजगार व स्वयंरोजगार भेटत असते.
शेवटी प्रशिक्षणार्थ्यांना वर व त्याच्या इच्छेवर अवलंबून असते चला तर जाणून घेऊया दोन ट्रेड केल्याचे फायदे नोकरीच्या दृष्टिकोनातून बघितले तर रेल्वे मध्ये इलेक्ट्रिक फिटर] एस टी महामंडळ मध्ये इलेक्ट्रिशन म्हणून] बी अँड सी मध्ये इलेक्ट्रिशन म्हणून ,
तर एमईसिबी च्या जनरेशन ,ट्रान्समिशन ,डिस्ट्रीब्यूशन ह्या विभागात आपणास शासकीय नोकरी लागू शकते तसेच मिलिटरीच्या विभागांमध्ये टेक्निशियन म्हणून आपणास जॉब मिळतो मिळू शकतो तसेच कोल माइन्स फॅक्टरी ,तसेच सर्व प्रकारच्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब मिळू शकते. परंतु तुम्हाला स्वयंरोजगार करावयाची असल्यास विद्युत ठेकेदार व्हायचे असल्यास तुम्हाला सुपरवायझर परीक्षा पास होणे गरजेचे आहे.
त्यासाठी प्रथम वीजतंत्री तारतंत्री पास झाल्यानंतर प्रथम तारतंत्री परवाना काढावे लागते त्याकरिता या वेबसाईटवर
www.seielngp.in या साइटवर आपणास ऑनलाइन फॉर्म भरावे लागतील भरल्यानंतर त्याची ऑनलाईन प्रिंट काढून मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स आपल्या जिल्ह्यातील ऊर्जा व तंत्र निरीक्षक विद्युत विभाग कार्यालय याठिकाणी चारशे रुपयाची चलान भरावे लागते .
त्यानंतर सहा महिन्यात तुम्हाला तारतंत्री विद्युत परवाना म्हणजेच विजयचे प्रत्यक्ष काम करण्याचा परवाना लायसन्स आपणास मिळते . त्यानंतर तुम्हाला साधारणता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रिकल सुपरवायझर कडे म्हणजे ठेकेदाराकडे तुमच्या नावाची नोंद करावी लागते.
त्यानंतर तो विद्युत ठेकेदार तुम्हाला एक वर्षाचा काम करण्याचा अनुभव प्रमाणपत्र देतात. त्यानंतर परत वरील साइटवर ऑनलाइन अर्ज करावे लागते .ते सुपरवायझर परीक्षा देण्यासाठी ही परीक्षा साधारणता मे महिन्यात दैनिक लोकमत मध्ये याची जाहिरात येत असते .
त्यानुसार आपणास ऑनलाइन परीक्षेचा फॉर्म भरावे लागते. ही परीक्षा विदर्भामध्ये नागपूर येथे होते ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला परत वरील साइटवर परवाना मिळण्याकरिता अर्ज करावा लागतो . परवाना आल्यानंतर आपणास एमएसईबी मध्ये विद्युत ठेके मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते . त्यानंतर तुम्हाला विद्युत कामाचा ठेका मिळू लागतो तेथे का साधारणता पाच लाख ते पंधरा लाख पर्यंत असते .
तसेच ज्या लोकांना नवीन घरासाठी एनर्जी मीटर पाहिजे असेल त्यांना टेस्ट रिपोर्ट देता येते . अशाप्रकारे आपणास वाटल्यास आपण चांगल्या प्रकारे स्वयंरोजगार करू शकतात शेवटी सर्व तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला नेमके काय करायचे ते तुम्ही ठरवा पण आयटीआय केल्यावर करिअरची पूर्ण खात्री आहे. ते तुम्ही रोजगार करू शकता व स्वयंरोजगार ही करू शकतात.
आयटीआय वायरमन केल्यानंतर पुढील फायदे
1) आयटीआय वायरमन केल्यानंतर बारावी समकक्षता मार्कशीट मिळते त्यासाठी दोन विषयांची परीक्षा द्यावी
लागते
2) पॉलिटेक्निक ला सेकंड इयरला ऍडमिशन
3) करस्पाँडंट डिप्लोमा सुद्धा करता येते
4) डिप्लोमा केल्यानंतर बीई सेकंड इयर ला प्रवेश मिळते
5) आयटीआय मध्ये निदेशक होण्यासाठी करण्यासाठी सिटीआय काय करता येते
आयटीआय वायरमन ट्रेड केल्यानंतर महाराष्ट्र शासन मध्ये नोकरीची संधी
जनरेशन
ट्रान्समिशन
डिस्ट्रीब्यूशन
b&c
नगरपरिषद
नगरपालिका
महानगरपालिका
आरोग्य विभाग
एस टी महामंडळ
कोल माईन्स
बीएसएनएल
मेट्रो रेल्वे
रेल्वे
मिलिटरी मध्ये टेक्निशियन म्हणून
रेल्वे मध्ये इलेक्ट्रिक फिटर म्हणून
इस्रो मध्ये
डी आर डी ओ
तसेच भारतातील सर्व प्रकारच्या कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये आयटीआय वायरमन केल्यानंतर भरपूर प्रमाणात जॉब ची संधी असते
ITI Wireman Salary
Salary depends on your skills. It may be high or it may be low but on average, a fresher could get around ₹8,000 to ₹10,000 per month i.e. ₹96,000 to ₹1,20,000 per annum.
संकलन :- श्री- एन.के.राठोड सर आयटीआय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
3 Comments
Wireman trade could be considered in MAHATRANSCO TECH -4 in the next advertisement ?
Please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻