ITI विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! गुणपत्रकाच्या स्वरूपात मोठा बदल, 'नापास' शेरा होणार गायब

ITI Marksheet New Rules 2026: गुणपत्रकातून 'नापास' शेरा हटणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा".

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) शिक्षण घेणाऱ्या लाखो प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Directorate General of Training (DGT) ने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना ITI गुणपत्रकाच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. हे बदल 2025 मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि 2026 मध्ये मुख्य परीक्षा देणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी लागू होणार आहेत.

ITI विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा गुणपत्रकाच्या स्वरूपात मोठा बदल नापास' शेरा होणार गायब

मुख्य परीक्षेच्या गुणपत्रकातून 'नापास' शेरा हटणार

आतापर्यंत ITI मधील दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षात एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर "नापास" (Fail) असा शेरा दिसत असे. मात्र, नवीन नियमांनुसार मुख्य परीक्षेच्या गुणपत्रकावर हा शेरा दिसणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, प्रशिक्षण किंवा नोकरीसाठी अर्ज करताना होणारा मानसिक ताण आणि अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) गुणांचा समावेश

ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) दिले जाते. आता या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या गुणांचाही समावेश अंतिम गुणपत्रकामध्ये केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्याचे अधिक अचूक मूल्यांकन होईल.

नवीन ई-नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट

प्रशिक्षणार्थ्यांना आता डिजिटल स्वरूपात नवीन National Trade Certificate (NTC) प्रदान करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र अधिक आधुनिक आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असेल.

APAR ID आणि Academic Bank of Credits ची सुविधा

नवीन गुणपत्रक आणि प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांचा APAR (Automated Permanent Academic Account Registry) क्रमांक नमूद केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांनी शिक्षणादरम्यान मिळवलेले शैक्षणिक क्रेडिट्स देखील गुणपत्रकात दिसतील. हे क्रेडिट्स Academic Bank of Credits (ABC) प्रणालीमध्ये साठवले जातील, ज्यामुळे भविष्यातील शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधी अधिक सुलभ होतील.

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण

ITI प्रशिक्षणार्थ्यांना लेखी परीक्षेत किमान 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या ट्रेडनुसार 50, 100 किंवा 250 गुणांचे पेपर असतात, ज्यामध्ये 250 गुणांचा प्रात्यक्षिक भाग महत्त्वाचा मानला जातो.

पुरवणी परीक्षेसाठी नियम कायम

मुख्य परीक्षेच्या गुणपत्रकात बदल करण्यात आले असले तरी पुरवणी (Supplementary) परीक्षेसाठी पूर्वीप्रमाणेच "उत्तीर्ण" किंवा "अनुत्तीर्ण" असा शेरा कायम राहणार असल्याचे DGT ने स्पष्ट केले आहे.

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod