Advertisement

आय.टी.आय.अमरावती येथील वेल्डर ट्रेड चा प्रशिक्षणार्थी फॅब्रिकेटर व्यवसायात केले करीअर.










आय.टी.आय.अमरावती येथील वेल्डर ट्रेड चा प्रशिक्षणार्थी फॅब्रिकेटर व्यवसायात केले करीअर.    


     आय.  टी.आय.वेल्डरच्या प्रशिक्षणार्थी ने  अडचणीवर मात करुन स्वतःच्या भरवश्यावर वेल्डीग कारखाना उभारला.. सन २०१०ते २०११या वर्षाचा संधाता व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी आहे .नाव अमोल कचरे  रा.नांदूरा ता.चा.बाजार  अमरावती ते चांदुरबाजार मार्गवर हे छोटेसे ग्रामीण क्षेत्रातून मी माझ्या जिवनाचा शिल्पकार मी स्वतः आहे सन्मानिय माझे शिक्षण वर्ग १२वी पर्यत.झाल्यावर माझे सर्व  मित्र तंत्र शिक्षण म्हणजेच (पाॕलिटेक्नीक) कडे प्रवेशासाठी धावत होते मी पन शर्यतीत होतो.... मग माझ्या डोळ्यासमोर माझी परीस्थीती सदैव येतअसत मी व्दीवधा मनस्थीतीत गेलो व पक्का विचार केला आपल्याला कमी-वेळात जास्त प्रगती करायची असेल तर आय.टी.आय.शिवाय पर्याय नाही.





मी अमरावती .पाॕलिटेक्निकचा अर्ज भरला व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावतीचा अर्ज भरला माझा दोन्ही ठिकाणी नंबर लागला तरी सुध्दा मी प्राधान्य दिला शास.औ.प्र.संस्था अमरावती येथे सत्र२०१०-२०११ संधाता व्यवसायात लागला. माझे मित्र मंडळी माझ्यावर नाराज झालीय मग माझ्या प्रशिक्षणाला सुरवात झाली मला माझ्या मनाप्रमाणे कर्तव्ये दक्ष निदेशक मला भेटले तोंडओळखच्या दिवशीच सरांनी सर्वाना स्पष्ट सांगून टाकले आपल्या काही शिकायचे वाटत असेल तर माझ्या तुकडीत या अन्यथा दुसऱ्या तुकडीत जाऊ शकता.हीच दणके बाज सराची गोष्ट मला माझ्या जिवनात शिकून गेली या प्रमाणेच पूढे प्रशिक्षण व पि.ओ.टी.एस.भरपूर कामे वाढत गेलीत नवनवीन जाॕब हाथाखालून जात गेली असे करता करता वर्ष केव्हा संपले कळलेच नाही परीक्षा आली परीक्षेला पास झालो सरांच्या म्हणन्या प्रमाणे अॕप्ररान्टीसशिप झाल्या शिवाय सस्थ बसु नका. नंतर शिकाऊ उमेदवारीला प्रवेश घेतला वर्षे संपले परीक्षा आली पास झालो नंतर मग श्री धोटे सराच्या अनूभवाचे बोल मुंबई कीवा पूणे येथे एक दोन पिरेड काढा नंतर तूम्ही तूमचा निर्णय घ्या ? मग टाटा मध्ये दोन पीरेड काढले व पैसा जमा केला व त्या पैशातूनच नंतर आपला स्वतःचा वेल्डीग वर्क शाॕप टाकन्याचे धाडस केला. 



त्या वर्क शाॕपचे उदघाटन श्री धोटे सरांच्या हस्तेच केले मला प्रत्येक वेळेस मोलाचे मार्गदर्शन लाभले आज मी जे आहे ते फक्त धोटे सरांच्या आशीर्वादने   मी माझे वेल्डींग वर्कशाॕप सन २०१४ला छोट्याश्या जागेत चालू केले आज मी अम-चां.बाजार पूसदा मार्गावर ४००० हजार स्के फूट वर स्थीत आहे शाॕप मध्ये तिन वेल्डर ७०००/रु प्रमाणे व तिन हेल्पर काम करतात.व माझ्या शाॕप मध्ये बैलबंन्डी ,पेरणी यंत्र, महाराजा गेट ,ग्रील गेट ,स्टेनस्टील ची कामे स्वीकारले जातात व वेळेत पूर्ण करुन दिल्या जातात आज मी संधाता व्यवसाय शिकून मी माझ्या जिवनाचा शिल्पकार जनू काही झालो . मित्रांनो तुमची ईच्छा शक्ती असेल तर काहीच अशक्य नाही.वेल्डर ट्रेड करतांना माझे मित्र हसायचे की वेल्डर करत आहे.पण मी डगमगलो नाही.पैसा पैसा करीत रडलो नाही.मेहणत करीत राहीलो.पैसा जमा केले आणी व्यवसाय सुरू केला.


आज मी चार जणाला रोजगार दिला आहे.माझे महिन्यांचे टर्मवर जास्त आहे. ही कीमया आहे.आय.टी.आय.वेल्डर करण्याचे .अशी माझी यशाची यशोगाथा आपणाला शेअर करीत आहोत. आपलाच आपल्या आय. टी.आय. चा प्रशिक्षणार्थी.    
अमोल कचरे फेब्रीकेशन वर्क शाॕप.




Post a Comment

0 Comments