मुली व महिला करिता फॅशन टेक्नॉलाजी बद्दल माहिती
Fashion Design And Technology Course Information in Marathi
आयटीआय मध्ये एक वर्षीय नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असुन 10 वी पास मुली व महिला करीता राखीव असते.
फॅशन टेक्नॉलाजी म्हणजे काय:-
फॅशन डिझायनिंग हे मानवतेचे एक वैशिष्ट्य आहे जे फॅब्रिक शैली नमुने रंग आणि विशिष्ट युगाची फॅशन परिभाषित करणारे एक क्षेत्र आहे.हे केवळ कपड्यात पुरतेच मर्यादित नाही तर त्यात वेगळे सामान हात पिशवी ,चप्पल्स, वास्तू,ज्वेलरी, या सर्व गोष्टींचा समावेश फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये केला जातो. आपल्याकडे फॅशन डिझाईनिंग खरोखर करण्याचे खरोखर कौशल्य असल्यास या क्षेत्रात आपल्यासाठी असंख्य नोकऱ्या आहेत फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण एक उत्तम करिअर या क्षेत्रामध्ये करू शकता. प्रत्येक व्यक्ती ला आपला प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडावा , अस वाटत असते. त्यासाठी कुठल्या कपड्याची निवड करावी .या साठी फॅशन. डिझाइनर ची आवश्यकता असते. मुली व महिला करीता उत्तम कोर्स हा फॅशन डिझायनिंग .
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी हा एक वर्षीय बिगर अभियांत्रिकी व्यवसाय असून या व्यवसायाकरिता दहावी पास झालेल्या मुला-मुलींना प्रवेश घेता येतो फॅशन डिझायनिंग हा शब्द दिसताच डोळे दिपवून टाकणारे ग्लँमर वल्र्ड, लाईट, मॉडेल ,फॅन्सी ड्रेस असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयात शिवण यंत्र अर्थात SEWING MACHINE हा अविभाज्य घटक असल्यामुळे फॅशन डिझायनिंग म्हणजे शिवणकामा निगडीत अभ्यासक्रम असा अर्थ काढला जातो हे निष्कर्ष योग्य च आहे
कारण Garment Construction हा देखिल या अभ्यासक्रमात अतंर्भुत आहे या व्यतिरिक्त Fashion Design and Technology या व्यवसायात Textile Science
Illustration
Draping Method
Computerized Designing ,
Marketing,
Project Report Industrial
Visit,
On Job Trainingअशा विभिन्न घटकांचा अभ्यास अंतर्भूत केलेला आहे
अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अर्थात हा विषय मूलभूत गरजेशी निगडित आहे आणि या गरजे चे स्वरूप दिवसेन दिवस वाढतच आहे मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत वस्त्राला ग्राहक असतो आपल्या उत्पन्नातील किती तरी पैसा आपण वस्त्रावर खर्च करीत असतो त्यामुळे व्यवसायात करिअर करणाऱ्या व्यक्तीला तर आहेच परंतु सर्वसामान्य व्यक्तीला देखील या व्यवसायाचे ज्ञान असणे वस्त्राची काळजी, सांभाळ ,उपयोग या दृष्टीनेअत्यंत आवश्यक आहे जेणे करून आपल्या पैस्याचा योग्य मोबदला आपल्या ला प्राप्त करणे शक्य होईल
Apparel Sector हा सध्याच्या काळात अत्यंत पैसा कमविण्याचा मार्ग ठरला आहे या उद्योगात सुत कातणारे, कापड तयार करणारे,छपाई व भरतकाम करणारे, रेडीमेड वस्त्र बनविणारे मार्केटिंग करणारे (Retail ,Wholesale) अशा विभिन्न क्षेत्रामध्ये रोजगार व स्वयं रोजगार देखील उपलब्ध आहे
फँशन शो, फँशन मँगझीन्स व माँडेल्स ची लाईफ स्टाईल पहाता या व्यवसायात प्रशिक्षण घेण्याकडे कल वाढत आहे फँशन डिझाइनिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी हा व्यवसाय पुर्ण करताच Apparel Industries मध्ये विभिन्न पदावर रोजगार करू शकता जसे Machine Operator, Supervisor, Line Cheak, Quality Checker इत्यादि रंगसंगती, छपाई काम, भरतकला, आकृती रेखाटन, शिवण काम अशा वेगवेगळ्या अभ्यास क्रमाचा समावेश असल्यामुळे विद्यार्थी स्वयंरोजगारा ची निवड करतो
अतिशय अल्प गुंतवणुकीने या व्यवसायाशी निगडित स्वयंरोजगार प्रशिक्षणा नंतर आपण सहज सुरू करु शकतो फँशन च्या वाढत्या प्रचार प्रसारामुळे आज भारतात बहुतांश ठिकाणी Garment Hub थाटले गेले आहेत त्याकरिता कुशल कारागीर निर्माण करण्याच्या उद्देशाने असे विविध व्यवसाय शासनाने सुरु केले आहेत Skill India अंतर्गत "कौशल भारत कुशल भारत "हा उद्देश पुर्ण करण्याच्या हेतुने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांन मध्ये असे विविध व्यवसाया संबधी प्रशिक्षण राबवले जात आहेत
Trade Syllabus - येथे क्लिक करा
आरती संतोष यादव (फँशन डिझाइनिंग अँन्ड टेक्नॉलॉजी )
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments