आयटीआय पांढरकवडा येथील ८० प्रशिक्षणार्थ्यांचे धूत ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स, छत्रपती संभाजीनगर येथे ऑन-द-जॉब ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पांढरकवडा येथील विविध व्यवसायांतील एकूण ८० प्रशिक्षणार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील धूत ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड येथे आयोजित करण्यात आलेले एक महिन्याचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) यशस्वीरित्या पूर्ण केले.
हे प्रशिक्षण दि. १३ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये वीजतंत्री, तारतंत्री, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि ICTSM (IT & Electronics System Maintenance) फिटर ,यांत्रिक मोटार गाडी व्यवसायांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास ₹१६,००० मानधन, एक वेळचे जेवण तसेच बसची मोफत सुविधा कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आली. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या बसद्वारे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सुरक्षितपणे आयटीआय पांढरकवडा येथे आणण्यात आले.
ही संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया संस्थेचे प्राचार्य श्री. व्ही. व्ही. थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आली. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठविणे व समन्वय साधण्यामध्ये श्री. एस. एम. बनसोड (शिल्प निदेशक), श्री. दुर्योधन नारनवरे (वीजतंत्री विभाग),श्री.जि.जि.फुटाणे शि.नि.तारतंत्री, सौ. अश्विनी लडके (मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स विभाग), श्री. मार्गदीप भाटशंकर (ICTSM विभाग) तसेच समन्वयक श्री. एन. के. राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक श्री. एन. के. राठोड यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीचे एचआर श्री. विनय धुळे तसेच धूत ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.
औद्योगिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ होणार असून, भविष्यात उद्योग क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

.webp)
0 Comments