आयटीआय पांढरकवडा येथे विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा
पांढरकवडा, दि. १४ ऑगस्ट २०२६ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा येथे दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ साजरा करण्यात आला.
संस्थेच्या प्राचार्य श्री व्ही.व्ही थोटे यांच्या मार्गदर्शनाखालीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक पी. डी. डोंगरे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. बनसोड उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते एन. के. राठोड व शैलेंद्र गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर बनसोड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी १४ ऑगस्ट या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
प्रमुख वक्ते शैलेंद्र गणवीर यांनी भारताच्या फाळणीचा इतिहास आणि त्यातून निर्माण झालेल्या मानवी संकटावर प्रकाश टाकला. भारताच्या फाळणीचा हा दिवस एक ऐतिहासिक आणि दुःखद अनुभवातून मिळालेला धडा असल्याचे त्यांनी सांगितले. फाळणीमुळे कोट्यवधी लोकांना आपली घरे, शेती, व्यवसाय तसेच पिढ्यान्पिढ्यांची संपत्ती सोडून स्थलांतर करावे लागले. या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर, हिंसाचार, कुटुंबांचे विस्थापन तसेच सामाजिक व आर्थिक नुकसान झाले. फाळणीच्या या वेदनादायी आठवणी पुढील पिढ्यांनी इतिहासातून धडा म्हणून जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते एन. के. राठोड यांनी भारताच्या फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच १४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या विभाजन विभीषिका स्मृती दिवसाचे महत्त्व, फाळणीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यावेळची परिस्थिती आणि त्यातून झालेली मानवी हानी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“इतिहास विसरायचा नाही,
इतिहासातून शिकायचे आहे;
भूतकाळातील वेदना आठवून,
भविष्यात एकतेचा मार्ग स्वीकारायचा आहे.”यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,
या कार्यक्रमासाठी सुधीर बनसोड,सौ. करुणा बनसोड, किशोर नारिंगे, जी. जी. फुटाणे, आकाश सोनवणे, कु.अश्विनी लडके, कु.वैष्णवी कुबडे, दुर्योधन नारनवरे, मार्गदीप भाटशंकर, हितेश भस्मे, हमराज जेधे, बबन कोवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. जी. फुटाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एम. एम. शेख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना भारताच्या फाळणीच्या इतिहासाची माहिती मिळाली तसेच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशाच्या अखंडतेचे महत्त्व अधोरेखित झाले.
📌 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा
आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.
- 🌐 Website: www.nkrathod.in
- 📘 Facebook: fb.com/nkrathod.in
- 🐦 Twitter (X): @nkrathod_in
- 📸 Instagram: @nkrathod.in
- 📢 Telegram: t.me/itiupdate
- ▶️ YouTube: YouTube Channel
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
- ✔ ITI प्रवेश माहिती
- ✔ परीक्षा व निकाल अपडेट
- ✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
- ✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
- ✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
- ✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना


0 Comments