Advertisement

राज्यातील आय.टी.आय. प्रवेशासाठी पुन्हा नव्याने अर्ज करता येणार ; रिक्त जागेवर मिळू शकेल प्रवेश- संचालक श्री. दि.अ. दळवी

 राज्यातील आय.टी.आय. प्रवेशासाठी पुन्हा  नव्याने अर्ज करता येणार ; रिक्त जागेवर मिळू शकेल प्रवेश

  

राज्यातील आय.टी.आय. प्रवेशासाठी पुन्हा  नव्याने अर्ज करता येणार ; रिक्त जागेवर मिळू शकेल प्रवेश- संचालक श्री. दि.अ.   दळवी

      राज्यातील शासकीय किंवा  अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांची संधी  हुकलेली आहे  अशा   इच्छूक    उमेदवारांना  रिक्त जागेवर  प्रवेशासाठी नव्याने आॕनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी करून दिलेली आहे.  

अश्या उमेदवारांनी दि.२६ आक्टोंबर पर्यंत http://admission.dvet.gov.in/किंवा www.dvet.gov.in ह्या अधिकृत  संकेतस्थळावर  जाऊन  अर्ज  करावा . अर्ज केलेल्या इच्छूक  उमेदवारांची  गुणवत्ता यादी दि. २७ आक्टोबरला  संबंधित  संस्थेत लावण्यात येईल. दि.२८ आॕक्टोंबर पासून  रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल.

 संकेतस्थळावर सूचित केलेल्या  नोटीफिकेशन प्रमाणे  पुढील कार्यवाही  करण्यात येणार आहे.शिल्प कारागीर योजना,आदिवासी उपाययोजना ,अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिकरण योजना ,अनुसूचीत जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा  रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी  ही  शेवटची संधी  संचालनालयाने  उपलब्ध करून दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे, हे विशेष.

समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीचा इच्छूक उमेदवारांनी  अवश्य लाभ घ्यावा. औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ अवश्य  घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जवळच्या औ.प्र.संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा.) संचालक श्री. दि.अ.  दळवी यांनी केलेले आहे


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments