आयटीआय चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथील देवेंद्र दिलीप टेकाडे ट्रेड पेंटर यांचे मिनिस्ट्री ऑफ कमुनिकेशन चेन्नई येथे स्किल ऑर्टिजन म्हणून निवड.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज परत तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन सक्सेस स्टोरी सध्या बघितलं तर दहावी पास वर फक्त आयटीआयच्या प्रशिक्षण पेंटर ट्रेड हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम शेवटी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे आपल्यावर अवलंबून असते.
देवेंद्र टेकाडे हा चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून त्याला एक बहीण आहे ,आई गुहीनी तर वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती डेपो मध्ये वाहन चालक आहे.असा कुटुंबातील कर्ता पुरुष देवेंद्र तर वडीलना वाटलं की आपला मुलगा आयटीआय करावं.
बहीण इंजिनिअरिंग डिप्लोमा करीत होते तर मुलांनी आयटीआय करावं जेनेकरून लवकर जाॅब मिळाले. दृष्टीकोनातून आयटीआय मध्ये पेंटर ट्रेड करायचे ठरवले.परंतु त्याला तर विजतंत्री करायचं होतं.आणि आवड पेंटींग कामाचं होते.देवेंद्र टेकाडे एसएमसी सातेफळ ता.चांदुर रेल्वे मध्ये झालं तर 12 वी पर्यंत शिक्षण चांदुर रेल्वे तेथेच झाले.
सत्र 2016-2018 यावर्षी आयटीआय चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथे पेंटर ट्रेड हया व्यवसायाचे अभ्यासक्रम पूर्ण करून 83% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. तर 2019-2020 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागीय कार्यशाळेत एक वर्षाचे अप्रेंटीशीप पूर्ण केले त्यामध्ये 80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.
सन 2021-2022 मध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ऑफिस कम्युनिकेशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चेन्नई या आस्थापना मध्ये टेक्निशियन पोस्ट साठी जागा निघाल्या त्यामध्ये फॉर्म भरला असता चेन्नई येथे ऑफलाईन परीक्षा झाल्या. त्या परीक्षेमध्ये भारतातून जनरल मेरीट मध्ये चौथ्या रॅंक घेऊन उत्तीर्ण झाला.आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी चेन्नई मध्ये जॉईन झाला.
आयटीआय पेंटर झालेल्या देवेंद्र टेकाडे ह्याला चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी लागल्याचा वडिलांना अतिशय आनंद झाला. जर तो आयटीआय केला नसता तर त्याला हा जाॅब मिळाला नसता.असे मत व्यक्त करताना त्याच्या वडिलांना आनंदाचे अश्रू अनावर झाले.त्यामुळे त्यांच्या परीवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मित्रांनो "हौऊसला बुलंद होना चाहिये " किस्मत के दरवाजे हो खुल जाते है! म्हणून विद्यार्थी मित्रांनो नेहमी बी पॉझिटिव्ह राहा. रोजगार मिळण्यासाठी आयटीआय एकमेव मार्ग आहे हे यावरून सिद्ध होते.
देवेंद्र त्याच्या यशाची श्रेय त्याचे आई-वडील, बहीण यांना देत आहे.
तसेच त्याला नियमित मार्गदर्शन करणारे त्याचे प्रशिक्षक श्री प्रमोद तायडे सर (शिल्पनिदेशक पेंटर) यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाने यशस्वी झाल्याचे मतं देवेंद्र यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीमध्ये असलेले स्वर्गवासी प्राचार्य श्री.गुरव साहेब यांचे सुध्दा देवेंद्र यांनी आभार मानले आहेत.
![]() |
| श्री प्रमोद तायडे सर (शिल्पनिदेशक पेंटर) |
आयटीआय चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथील देवेंद्र दिलीप टेकाडे ट्रेड पेंटर यांचे मिनिस्ट्री ऑफ कमुनिकेशन चेन्नई येथे स्किल ऑर्टिजन म्हणून निवड.
सध्यास्थितील विराजमान प्राचार्य श्री.दिनेश बोबडे यांनी देवेंद्र टेकाडे आणि त्याचे प्रशिक्षक यांना अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री.प्रदिप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी देवेंद्र टेकाडे आणि त्याचे प्रशिक्षक श्री प्रमोद तायडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod



0 Comments