शासकीय आय.टी.आय.अहमदनगर नाशिक विभाग येथील विजतंत्री आणि वायरमन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जाॅब ट्रेनिंग
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर ,जिल्हा अहमदनगर येथील इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना 18 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे प्राचार्य मा. खालीद जागीरदार यांनी स्थानिक एम.आय.डी.सी.मधील नामांकित कंपनी अष्टविनायक इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर, येथे रवाना केले.
ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कंट्रोल पॅनलचे मॅन्युफॅक्चरिंग होत असून दोन्ही ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना कंट्रोल सर्किट, पावर सर्किट, इन्स्टॉलेशन डायग्राम, स्किमॅटिक डायग्राम, रीडिंग, फेरुल कोडींग हरर्नेसिंग, ॲक्सेसरीज माउंटिंग, मीटर माउंटींग, सीबी माउंटिंग,क्वालिटी कंट्रोल विभाग पंधरा दिवस प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार आहे.
भविष्यात ऑनजाॅब ट्रेनिंग मुळे ओजेटी घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांना या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अनुभव असल्याने त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची वाट मोकळी झालेली आहे. यामुळे ते कुशल कारागीर तयार होऊन कंपनीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होऊन औद्योगिक क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने देशाच्या विकासासाठी आय.टी.आय.चा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा हातभार असणार आहे.
विजतंत्री व तारतंत्री या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची ओजिटीची जबाबदारी कंपनीचे प्रमुख चेअरमन माननीय श्री राहुलजी फटांगरे, आणि व्हाईस चेअरमन फटांगरे मॅडम यांनी घेतली आहे. अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कंपनीतील विविध ज्ञान प्राप्त व्हावा त्यांच्यामध्ये असलेला कौशल्यांचा विकास व्हावा त्यांचा मनोबल वाढावे यासाठी शासनाने गेल्या वर्षीपासून ऑन द जाब देणे सुरू केलेले आहे.
या ऑनजाॅब ट्रेनिंग अष्टविनायक इलेक्ट्रिकल प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये मिळावा याकरिता श्री. धनंजय धोंगडे सर तसेच व्ही. आर. कुरापाटी मॅडम यांनी विशेष परिश्रम केलेले आहे. तसेच संस्थेचे प्राचार्य यांनी प्रशिक्षणार्थ्या व व्यवसाय निदेशक श्री धोंगडे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्यावेळी प्रशिक्षणास परवानगी, शुभेच्छा देऊन तसेच प्रशिक्षणार्थीना प्रोत्साहन दिले त्याबद्दल प्राचार्य खालिद जी जहागीरदार साहेब. उपप्राचार्यश्री प्रभुणे साहेब, गटनिदशक श्री. बी. के. जाधव सर, कुरापती मॅडम यांचे धोंगडे सर यांनीआभार व्यक्त करण्यात येत आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod




.webp)
0 Comments