आयटीआय प्रवेश ऑनलाइन अर्ज कन्फर्मेशन करणे आवश्यक तर दिनांक १९ जुन पासून जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन कन्फर्मेशन करणे बंधनकारक आहे.
राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दरम्यान उमेदवारांनी पूर्ण भरलेले व प्रवेश शुल्क भरलेले अर्ज नजीकच्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून व मूळ कागदपत्रे सादर करून संस्थेमार्फत निश्चित करावयाचे असतात. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्ज निश्चितीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी भरलेली संपूर्ण माहिती जसे
- पूर्ण नाव,
- वडिलांचे नाव,
- आईचे नाव,
- जन्मतारीख,
- स्त्री अथवा पुरुष
याची माहिती, जात प्रमाणपत्रावरील नाव, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची अंतिम तारीख इत्यादी पात्र निकषासाठी सादर केलेली प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे अचूक तपासणी होणे आवश्यक असते.
यावर फक्त प्रवेश प्रक्रियाच नव्हे तर परीक्षा व अंतिम प्रमाणपत्र या बाबी अवलंबून असतात या माहितीमध्ये त्रुटी राहिल्यास अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते.
प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने कोणत्या संस्थेमधून अर्ज निश्चित केला आहे याची माहिती पोर्टलवर उपलब्ध असते यामुळे असे कळविण्यात येते की, अर्ज निश्चितीमध्ये त्रुटी राहिल्यामुळे प्रवेश प्रक्रिया दरम्यान अथवा प्रवेश झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षा प्रमाणपत्र इत्यादी मध्ये काही अडचणी निर्माण होते त्यामुळे नजीकच्या आयटीआय मध्ये जाऊन प्रवेश अर्ज निश्चिती करणे बंधनकारक आहे .
(दि.अ. दळवी) संचालक
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments