Advertisement

आयटीआयच्या प्रवेश फेरी करीता जनरल मेरिट लिस्ट वेबसाईटवर जाहीर तर अंतिम यादी 20जुलै २०२३ रोजी 5 वाजता होणार जाहीर

आयटीआयच्या प्रवेश फेरी करीता जनरल मेरिट लिस्ट जाहीर तर अंतिम यादी 20जुलै २०२३ रोजी 5 होणार जाहीर


1) admission.dvet.gov.in या वेबसाईटवर जाऊन कॅंडिडेट लोगिन मध्ये रजिस्टर कॅंडिडेट लोगिन मध्ये रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून आपले अकाउंट लॉगिन करावे.

2) ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये एप्लीकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस वर क्लिक करून आपला मेरिट क्रमांक पाहू शकाल.

3) आपणास राज्यातील व जिल्ह्यातील मेरिट क्रमांक दिसेल.

तसेच जिल्ह्यातील कॅटेगिरी मिरीट नंबर दिसेल.


व्यवसाय निहाय निवड यादी दिनांक 20 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. सदर यादी ऑनलाईन वरील प्रमाणेच पाहावे.

ऍडमिशन स्टेटस (Admission status)मध्ये आपणास आपला नंबर कोणत्या संस्थेत लागला आहे. हे आपणास माहीत होईल.

जर ऍडमिशन स्टेटस मध्ये Name of ITI Admitted in समोर NA असेल तर आपली निवड झालेली नाही. असे समजावे.


औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 1 लाख 54 हजार 932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात 500 रुपय वाढ  करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. 

तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments