Advertisement

महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी विद्युत सहाय्यक ५३४७ पदासाठी सरळसेवा भरती

 महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी विद्युत सहाय्यक ५३४७ पदासाठी सरळसेवा भरत


महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी विद्युत सहाय्यक ५३४७ पदासाठी सरळसेवा भरती


आयटीआय विजतंत्री आणि तारतंत्री पास असलेल्या उमेदवारांसाठी ५३४७ पदासाठी विद्युत सहाय्यक  ह्या पदासाठी थेट अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे .

दिनांक २९/१२/२०२३ अखेर शैक्षणिक अर्हता 

अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्णआणि 

ब) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र,

उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्ष असणे आवश्यक आहे.

मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा

५ वर्ष शिथिलक्षम राहील.

दिनांक २९/१२/२०२३ अखेर वयोमर्यादा 

  1.  उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे.
  2.  मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५ वर्षे शिथिलक्षम राहील.
  3.  दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  4.  माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षाची राहील,
  5. महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
  6. तदर्थ मंडल/तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण
  7. कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील, खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत ०५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील. ३.७
  8.  महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-२०२३/प्र.क्र.१४/कार्या-१२, दिनांक ०३ मार्च, २०२३ अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत ०२ वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
  9.  "अनाथ" आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.
  10.  एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
  11.  परीक्षेच्या कोणत्याही टप्यावर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
  12.  वयोमर्यादकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.

मानधन

अ) प्रथम वर्ष- 15000

ब) द्वितीय वर्ष-16000

क) तृतीय वर्ष-17000

उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.

"विद्युत सहाय्यक" या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना 

"तंत्रज्ञ" या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.

महत्वाच्या तारखा 

ऑन लाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL Link कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी-२०२४ मध्ये प्रसिध्द करण्यात येईल. त्यासोबत ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.

 ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी (Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी / मार्च-२०२४

अधिकृत संकेतस्थळ:-https://www.mahadiscom.in/en/home/

जाहिरात ( Notification)   - येथे क्लिक करा 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments