Advertisement

यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रीया सुरू -गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

 यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रीया सुरू 

यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रीया सुरू

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सत्र ऑगस्ट २०२४ करीता प्रवेश प्रकीया सुरु झालेली आहे. सदर प्रवेश प्रक्रीया हि केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, प्रवेशाची प्रमाणित कार्यपध्दती तसेच प्रवेश अर्ज व प्रवेशाचे वेळापत्रक https://admission.dvet.gov.in/   या संकेतस्थळावर दिनांक ०३ जुन २०२४ पासुन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानातील व्यवसायाचे अभ्यासक्रम देखिल उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रीयेकरीता पात्रता अभ्यासक्रमानुसार १० वी अनुत्तीर्ण /१० वी उत्तीर्ण अशी आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारास प्रशिक्षणा दरम्यान कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देणे, विद्यावेतन, शुल्क प्रतिपुर्ती, १० वी १२ वी समकक्षता, प्रशिक्षण संपताच शिकाउ उमेदवारी, रोजगाराची संधी, उद्योग धंदयातील तज्ञांचे मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्यु इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणानंतर मोठ्या कंपन्यात रोजगार उपलब्ध होतो शिवाय स्वतःचा उद्योगही सुरू करता येतो. तसेच आयटीआय नंतर पॉलिटेक्निक द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश इच्छुक उमेदवारांकरीता जिल्ह्यातील १८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेमध्ये प्रवेशाबाबत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत असुन त्याचा उमेदवारांनी लाभा घ्यावा तसेच प्रवेश प्रक्रीयेबाबत शंका असल्यास शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संपर्क साधावा असे आवाहन श्री. जी. यु. राजुरकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.

आपल्या मुलांनी दहावीनंतर कोणते शिक्षण घ्यावे व ते शिक्षण घेतल्या व त्याला नोकरी मिळेल का असे एक ना अनेक प्रश्न पालकांना पडत असतात. शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला पटकन नोकरी हवी असते. सध्या वाढत्त्या व्यवसायिक अभ्यासक्रमामुळे इटपट नोकरीच्या संधी उपलब्ध  आहेत. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षण कुशल कामगार तयार होऊन स्वयंरोजगारासाठी सक्षम मानले जाते. विशेषता मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून १८ शासकीय व ४ अशासकीय संस्था आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्ष व दोन वर्ष अभ्यासक्रमाचे व्यवसाय आहेत. जिल्ह्यामध्ये यावर्षी प्रवेशाकरीता एकुण ३३ व्यवसायामध्ये ४६७६ जागा उपलब्ध असुन विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा असे आवाहन जी यु राजुरकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी केले .


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram-https://t.me/itiupda.

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments