महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत आयटीआय पास विद्युत सहाय्यक 2623 पदासाठी मेगा भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी ७ परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालये आहेत. त्या त्या विभागीय कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट- ४ मधील विभागस्तरीय सेवाजेष्ठतेतील "विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी)" या पदाची रिक्तपदे एकत्रित करुन अनुशेषाप्रमाणे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.
परिक्षा शुल्कः
उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यापूर्वी व परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यापूर्वी आपण सदर पदासाठी पात्र आहोत याची खात्री करावी व नंतरच अर्ज व परीक्षा शुल्क भरावे.
उमेदवाराने खालीलप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम (वस्तु व सेवाकरा सह) भरावी.
1)खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी-रु. ५००/-
2) मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील
उमेदवारांसाठीरु. २५०/-
3) जाहिरातीत नमुद दिव्यांग प्रवर्गाकरीता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परिक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
Notification (जाहीरात) -PDF DOWNLOAD
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-31/07/2024
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram-https://t.me/itiupda.
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments