आयटीआय पालघर येथे जागतिक युवा कौशल्य दीन उत्साहात साजरा
संयुक्त राष्ट्र महासंघाने ११ डिसेंबर २०१४ मध्ये हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या दिवसापासून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. तरूणाईला सशक्त करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना २१ व्या शतकातील कार्यशक्तीसाठी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून या दिवसाची घोषणा करण्यात आली.
जगभरात जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेण महत्वाचं आहे. दरवर्षी १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आयटीआय पालघर येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त संस्थेतील १७ प्रशिक्षणार्थी यांना बिल्स जी व्ही एस फार्मा पालघर मधील नामांकित कंपनीत आज जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री महेशकुमार सिडाम, प्राचार्य उमाकांत लोखंडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.या दिवशी तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी उत्तम सामाजिक-आर्थिक वातावरण देण्याचे प्रयत्न केले जातात. असे उमाकांत लोखंडे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले.
तरूणांना रोजगार आणि उद्योजगतेसाठी सुसज्ज करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. या दिवशी तरूणांमधील बेरोजगारीची समस्या कमी करणे, तसेच त्यांच्या कौशल्याबाबत जनजागृती करण्याचे काम केले जाते.
जागतिक युवा कौशल्य दिन २०२४ ची थीम
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त एक थीम तयार करण्यात आली आहे – *"शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य"* ही यावर्षाची थीम आहे. शांतता निर्माण, संघर्ष निराकरण आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमध्ये तरुण कसे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात यावर प्रकाश टाकण्यासाठी या ही थीम ठेवण्यात आली आहे.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. याच दिवशी त्यांनी *‘कौशल्य भारत’* अभियानाला सुरूवात केली. याद्वारे त्यांनी कौशल्य विकासाला महत्त्व प्राप्त करूण देण्याचे आवाहन केले.
भारतात बेराजगीरीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारत सरकार दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या प्रमाणात साजरा करते.या कार्यक्रमांचा उद्देश युवकांना कौशल्य विकास योजना आणि त्यांना उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देणे हा आहे.
हा जागतिक युवा कौशल्य दिन हा तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या दिवशी आपल्याला तरुणांची क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पूर्ण *क्षमतेपर्यंत* पोहोचण्यास मदत करण्यासाठी *प्रेरणा* देली जाते. असे महेशकुमार सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य यांनी आय टी आय मधील युवकांना मार्गदर्शन केले.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram-https://t.me/itiupda.
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments