आयटीआय पांढरकवडा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती मा.मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता, विभाग यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आयटीआय मध्ये जयंती साजरी करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य श्री राहुल पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक श्री गंगाधर आत्राम व्यवस्थापन समिती सदस्य तर प्रमुख अतिथी म्हणून श्री रिकपचंद मुथा व्यवस्थापन समिती सदस्य पांढरकवडा ,संस्थेचे गटनिदेशक श्री गजेंद्र पाटील ,श्री माणिक केवटे ,श्री.एन .के. राठोड यांच्या प्रमुख उपस्थिती होती . प्रथम मान्यवरांचे असते पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले जयंती समितीच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविक श्री प्रदीप सोमकर यांनी केले त्यांच्या प्रस्ताविकेतून एकात्मक मानवतावाद, भारतीय परंपरा,कार्यसिद्धता ,संस्कार क्षमता ,बाबत प्रास्तविकेतून विशद केले या प्रसंगी श्री माणिक केवटे आणि एन के राठोड यांची भाषणे झाले.
जयंतीचे प्रमुख वक्ता श्री गंगाधर आत्राम यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विचारधारा ,भारतीय संस्कृती ,एक प्रचारक ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पदावर येऊन त्यांच्यामधील राष्ट्रभक्ती विषयी विस्तृत समालोचन केले आणि प्रशिक्षणार्थी यांना माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम श्री.जी. जी..फुटाणे,श्री किशोर नारिंगे ,दुर्योधन नानवरे ,बबन कोवे, लखन जेदे यांनी केले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन कु.दिपाली कोल्हे यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्री गणेश फुटाणे यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने जयंतीचे सांगता करण्यात आले या जयंती करिता संस्थेतील कर्मचारी वुंद आणि प्रशिक्षणार्थी आणि बहुसंख्येने उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
 




.webp) 
.png) 
%20(1).webp) 
.webp) 
.jpg) 
 
0 Comments