स्किल्स इन ब्यूटी, सक्सेस इन लाइफ
कॉस्मेटॉलॉजी प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण – यशाची नवी ओळख
आजची महिला केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती स्वप्ने पाहते, स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिते आणि आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार करते. मात्र अनेक वेळा संधी, योग्य मार्गदर्शन आणि कौशल्याच्या अभावामुळे तिची स्वप्ने अर्धवटच राहतात. अशा वेळी कॉस्मेटॉलॉजी (Beauty & Wellness) हे क्षेत्र महिलांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे.
आजच्या बदलत्या युगात केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र पुरेसे नसून प्रत्यक्ष उपयोगी पडणारे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कॉस्मेटॉलॉजी प्रशिक्षण महिलांना केवळ रोजगार देत नाही, तर त्यांना आत्मविश्वास, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक ओळख देण्याचे काम करते.
या प्रशिक्षणामध्ये हेअर स्टायलिंग, स्किन केअर, मेकअप आर्ट, फेशियल, स्पा थेरपी, नेल आर्ट, ब्रायडल मेकअप, हेअर कटिंग आणि सलून मॅनेजमेंट यांचे सखोल आणि प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. अभ्यासक्रमामध्ये 70 टक्के प्रॅक्टिकल आणि 30 टक्के थिअरी यावर भर दिला जातो, त्यामुळे महिला प्रत्यक्ष कामासाठी पूर्णपणे सक्षम बनतात.
आधुनिक उपकरणे, अनुभवी महिला प्रशिक्षक आणि अद्ययावत अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. तसेच ग्राहक हाताळणी, स्वच्छता नियम, उत्पादनांची माहिती, व्यावसायिक शिस्त आणि आत्मविश्वासाने संवाद साधण्याचे कौशल्यही शिकवले जाते. यामुळे महिला केवळ कुशल ब्युटी प्रोफेशनलच नव्हे, तर यशस्वी उद्योजिका बनतात.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक महिलांनी स्वतःचा ब्युटी पार्लर, सलून, मेकअप स्टुडिओ किंवा स्पा सेंटर सुरू करून स्वतःसह इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. काही महिला नामांकित सलून, फॅशन इंडस्ट्री आणि मीडिया क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत.
‘स्किल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या योजनांमुळे महिलांसाठी कौशल्याधारित शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे कॉस्मेटॉलॉजी हे केवळ करिअर नसून, महिलांच्या सक्षमीकरणाचा मजबूत पाया ठरत आहे.
योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर प्रत्येक महिला स्वतःची एक मोठी यशोगाथा लिहू शकते.
म्हणूनच –
🌸 महिला सक्षम तर कुटुंब सक्षम
🌸 कुटुंब सक्षम तर समाज सक्षम
आणि हाच खरा अर्थ आहे –
💖 “स्किल्स इन ब्यूटी, सक्सेस इन लाइफ” 💖
महिलांनी सक्षम बनण्यासाठी आजच जवळच्या शा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भेट देऊन कॉस्मेटॉलॉजी या व्यवसायात आपला प्रवेश निश्चित करावा.
संजीवनी जाधव ( शि.नि. cosmetology)
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments