Advertisement

DIPEX 2026 : राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात अमरावती विभागाची उल्लेखनीय कामगिरी

 DIPEX 2026 : राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात अमरावती विभागाची उल्लेखनीय कामगिरी

DIPEX 2026 : राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात अमरावती विभागाची उल्लेखनीय कामगिरी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सुजन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (महाराष्ट्र शासन) तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान स्वर्गीय रतन टाटा नगर, एमआयटी कॅम्पस येथे राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शन (DIPEX 2026) आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई व छत्रपती संभाजीनगर या पाच विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अमरावती विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.

ITI देऊळगाव राजा – फिटर ट्रेडचा राज्यात प्रथम क्रमांक

इंजिनिअरिंग व्यवसायातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथील फिटर ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांनी “All in One शेतीसाठी उपयुक्त उपकरण” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पामध्ये शेतीतील विविध कामे सुलभ व कमी खर्चात करण्यासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान सादर करण्यात आले होते.

या प्रकल्पामध्ये खालील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला:

सोहम पवार

हर्षल पडघण

शाहबाज खान

या विद्यार्थ्यांना व्यवसाय निदेशक शुक्ला सर यांचे मार्गदर्शन लाभले.

ITI दिग्रस – ड्रेस मेकिंग ट्रेडचा द्वितीय क्रमांक

नॉन-इंजिनिअरिंग व्यवसायातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस (जि. यवतमाळ) येथील ड्रेस मेकिंग ट्रेडच्या प्रशिक्षणार्थिनींनी राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला.

DIPEX 2026 : राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात अमरावती विभागाची उल्लेखनीय कामगिरी

या यशामध्ये खालील प्रशिक्षणार्थिनींचा सहभाग होता:

कु. रोहिणी डोंइरे

कु. मोहिनी राठोड

कु. नंदिनी चव्हाण

या विद्यार्थिनींना शिल्पनिदेशिका सौ. चेतना ढोके यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व स्तरातून अभिनंदन

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करून संस्थेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

DIPEX 2026 : राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात अमरावती विभागाची उल्लेखनीय कामगिरी


✍️ लेखन / शुभेच्छुक : श्री. एन. के. राठोड सर

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments