भरती मेळावा – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी येथे Endurance Technologies Ltd. चा उत्साहपूर्ण भरती मेळावा संपन्न
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी येथे Endurance Technologies Limited या नामांकित कंपनीचा भरती मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या भरती मेळाव्यात सहभाग नोंदविला. उद्योग क्षेत्राशी थेट संवाद साधण्याची आणि रोजगाराच्या संधींबाबत माहिती मिळविण्याची ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी ठरली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मा. प्राचार्य श्री. संजय तेलतूमडे साहेब यांनी भूषविले. यावेळी अप्रेंटिसशिप सल्लागार श्री. राकेशकुमार कोडापे तसेच कंपनीचे डेप्युटी मॅनेजर (HR) श्री. प्रशांत वालेवाल व त्यांची टीम प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान श्री. प्रशांत वालेवाल यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचा सविस्तर परिचय करून देत कंपनीचे कार्य, आधुनिक उत्पादन प्रक्रिया, रोजगाराच्या संधी तसेच करिअरच्या विविध संधींबाबत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये, शिस्त आणि कामातील गुणवत्ता यांचे महत्त्व पटवून दिले.
अप्रेंटिसशिप सल्लागार श्री. राकेशकुमार कोडापे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपचे महत्त्व विषद करून कौशल्य विकासाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, रोजगारक्षमता वाढविणे आणि स्वावलंबनासाठी अप्रेंटिसशिप ही अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आहे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा. प्राचार्य श्री. संजय तेलतूमडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी सांगितले की,
“आज आपण आईच्या प्रेमावर आणि वडिलांच्या कष्टाच्या अन्नावर जगत आहोत. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचे अन्न कमावण्याची जबाबदारी आपलीच आहे.”
त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या भरती मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडले जाण्याची, करिअरच्या संधी समजून घेण्याची तसेच उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील श्री. राजेश ढबाले (गटनिदेशक), श्री. लेनगुले (गटनिदेशक) तसेच सर्व निदेशक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments