Advertisement

महाराष्ट्र ITI प्रवेश 2026: पहिली ते चौथी प्रवेश फेरी संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र ITI प्रवेश 2026: पहिली ते चौथी प्रवेश फेरी – संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र ITI प्रवेश 2026 प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या असून प्रत्येक फेरीत उमेदवारांनी ऑनलाइन पर्याय (Choices) भरून वेळेत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. खाली प्रत्येक प्रवेश फेरीचे वेळापत्रक आणि महत्त्वाचे नियम दिले आहेत.

महाराष्ट्र ITI प्रवेश 2026: पहिली ते चौथी प्रवेश फेरी संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचना

पहिली प्रवेश फेरी

  • निवड यादी जाहीर: 2 जुलै 2026, सायंकाळी 5.00 वाजता

  • प्रवेश व कागदपत्र पडताळणी: 3 जुलै 2026 ते 7 जुलै 2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)

महत्त्वाची सूचना:
जर उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीच्या (First Preference) संस्थेत जागा मिळाली, तर प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश घेतला किंवा न घेतला तरी अशा उमेदवाराला दुसरी, तिसरी आणि चौथी प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही.


दुसरी प्रवेश फेरी

ऑनलाइन पर्याय भरणे

  • 3 जुलै 2026 (सकाळी 9.00 वाजेपासून)

  • 7 जुलै 2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)

निवड यादी जाहीर

  • 12 जुलै 2026, सायंकाळी 5.00 वाजता

प्रवेश व कागदपत्र पडताळणी

  • 13 जुलै 2026 ते 16 जुलै 2026

महत्त्वाची सूचना:
पहिल्या तीन पसंतींपैकी कोणत्याही पर्यायावर जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही.


तिसरी प्रवेश फेरी

ऑनलाइन पर्याय भरणे

  • 13 जुलै 2026 (सकाळी 9.00 वाजेपासून)

  • 16 जुलै 2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)

निवड यादी जाहीर

  • 21 जुलै 2026, सायंकाळी 5.00 वाजता

प्रवेश व कागदपत्र पडताळणी

  • 22 जुलै 2026 ते 25 जुलै 2026

महत्त्वाची सूचना:
पहिल्या पाच पसंतींपैकी कोणत्याही पर्यायावर जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अशा उमेदवारांना चौथ्या प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही.


चौथी प्रवेश फेरी

ऑनलाइन पर्याय भरणे

  • 22 जुलै 2026 (सकाळी 9.00 वाजेपासून)

  • 25 जुलै 2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)

निवड यादी जाहीर

  • 30 जुलै 2026, सायंकाळी 5.00 वाजता

प्रवेश व कागदपत्र पडताळणी

  • 31 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026

महत्त्वाची सूचना:
चौथ्या फेरीत कोणत्याही पसंतीच्या पर्यायावर जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.


समुपदेशन (Counselling) प्रवेश फेरी

ज्या उमेदवारांना नियोजित वेळेत ऑनलाइन अर्ज करता आला नाही किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यांच्यासाठी समुपदेशन प्रवेश फेरीची सुविधा उपलब्ध असेल.

  • कालावधी: 3 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026

  • सुविधा: नवीन अर्ज, अर्जामध्ये दुरुस्ती (Edit), अर्ज शुल्क भरणे आणि अर्ज निश्चित करणे.


उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी आपले पर्याय (Choices) काळजीपूर्वक तपासा.

  • नवीन पर्याय भरले नाहीत तर मागील फेरीतील पर्यायच ग्राह्य धरले जातील.

  • मूळ कागदपत्रांसह संबंधित ITI संस्थेत वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • प्रवेश निश्चित केल्यानंतर पुढील प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही, त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या.

  • आवश्यक कागदपत्रे

    • इयत्ता 10 वी गुणपत्रिका
    • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
    • अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन-क्रीमी लेयर/EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • पासपोर्ट आकाराचा फोटो

आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod

✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाण

Post a Comment

0 Comments