शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब येथे ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूरचा यशस्वी कॅम्पस ड्राईव्ह
कळंब, दि. १ जुलै २०२६ :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब येथे ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूर यांच्या वतीने गारमेंट क्षेत्रातील विविध पदांसाठी जिल्हास्तरीय कॅम्पस ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कॅम्पस ड्राईव्हमध्ये शासकीय आयटीआय कळंब, राळेगाव, अंतरगाव, नेर व बाभूळगाव येथील एकूण ४८ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. त्यापैकी ३२ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली, ही बाब अत्यंत समाधानकारक ठरली.
कार्यक्रमादरम्यान ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूरचे एचआर मॅनेजर श्री. अतुल काळे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी उपलब्ध रोजगाराच्या संधी, वेतन संरचना, विविध सुविधा, करिअरमधील प्रगतीच्या संधी तसेच अप्रेंटिसशिप व रोजगार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबचे प्रभारी प्राचार्य श्री. बी. टी. राठोड यांनी भूषविले.
सदर कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन जिल्हा अप्रेंटिसशिप प्रमुख तथा सहाय्यक उमेदवारी सल्लागार श्री. राकेशकुमार कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील विविध आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी श्री. विलास गाठे, कु. सिमरन मॅडम, श्री. अक्षय राठोड तसेच शासकीय आयटीआय कळंबच्या सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा :
कंपनी : ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूर
स्थळ : शासकीय आयटीआय, कळंब
दिनांक : १ जुलै २०२६
उपस्थित उमेदवार : ४८
निवड झालेले उमेदवार : ३२
सहभागी संस्था : शासकीय आयटीआय कळंब, राळेगाव, अंतरगाव, नेर व बाभूळगाव
या यशस्वी कॅम्पस ड्राईव्हमुळे जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाण


0 Comments