Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

 आयटीआय पांढरकवडा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

पांढरकवडा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धातील शूर जवानांच्या अद्वितीय पराक्रम, त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

आयटीआय पांढरकवडा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक श्री. प्रदीप भांगे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. एन. के. राठोड यांनी कारगिल युद्धातील शूर जवानांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल मार्गदर्शन केले. “कारगिलच्या शहिदांमुळे आज आपण सुरक्षित आहोत,” असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थींमध्ये देशप्रेम, राष्ट्रसेवा आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा जागवली.

या प्रसंगी माजी सैनिक श्री. मनोज पिंन्नमवार यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या लष्करी जीवनातील अनुभव प्रशिक्षणार्थींशी शेअर केले. तसेच शिस्त, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून देत प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला संस्थेतील श्री. सुधीर बनसोड, श्री. एम. एम. शेख, श्री. गनविर, श्री. आकाश सोनोने, श्री. दुर्योधन नारनवरे, सौ. करुणा सुधीर बनसोड, सौ. गिरी, श्री. दयानंद आत्राम, श्री. बबन कोवे, श्री. लखन जेधे यांच्यासह इतर कर्मचारी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश फुटाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुधीर बनसोड यांनी केले.

ITI पांढरकवडा येथे कारगिल विजय दिवस कार्यक्रम कारगिल विजय दिवस कार्यक्रम ITI पांढरकवडा कारगिल विजय दिवस कारगिल विजय दिवस सोहळा
त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींचे आभार मानले.

देशभक्तीपूर्ण वातावरणात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments