टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा ४५ आयटीआयसोबत सामंजस्य करार यातून सुमारे ८ हजार आयटीआय प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार .
आयटीआय संस्थांमध्ये हलके वाहन तंत्रज्ञ (एलएमव्ही) या अभ्यासक्रमांसाठी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येऊन तेथील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचा यासाठी सामंजस्य करार झाला आहे. टोयोटा किर्लोस्कर कंपनी या लॅब मध्ये प्रशिक्षण देणार आहे. यातून सुमारे ८ हजार आयटीआय प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गुरुवारी हा करार करण्यात आला. टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाठी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होत्या.
यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव आदी उपस्थित होते. पुढील ५ वर्षांत कंपनीच्या सहकार्याने राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये हलके वाहन तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार आहे.
तसेच या प्रयोगशाळेत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या सर्व प्रयोगशाळा तीन टप्प्यांत सुरू करण्यात येतील. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून
पहिला टप्पा (२०२५-२६): मराठवाडा आणि नागपूर विभागातील १६ आयटीआयवर लक्ष केंद्रित करणे
टप्पा २ (२०२६-२८): अमरावती आणि नाशिक विभागांमध्ये विस्तार
टप्पा ३ (२०२९-३०): मुंबई आणि पुणे विभागातील संस्थांचा समावेश
मार्च २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १६ प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाठी यांनी दिली.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod



0 Comments