Advertisement

आयटीआय कारंजा लाड येथील कु. साक्षी वरठी ही CTS परीक्षा मध्ये विजतंत्री व्यवसायातून भारतातुन तिसरी तर मुलीतुन पहिली.

आयटीआय कारंजा लाड येथील कु. साक्षी वरठी ही CTS परीक्षा मध्ये विजतंत्री व्यवसायातून भारतातुन तिसरी तर मुलीतुन पहिली.

आयटीआय कारंजा लाड येथील कु. साक्षी वरटी ही CTS परीक्षा मध्ये विजतंत्री व्यवसायातून भारतातुन तिसरी तर मुलीतुन पहिली.

मूर्ती लहान कीर्ती महान ऑटो चालकाची मुलगी भारतातून तिसरी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा लाड येथील साक्षी ही भारतातून तिसरी व मुलीतून पहिली येउन संस्थेचे  नाव उज्ज्वल केले आहे.

तसे बघितले तर मागील वर्षापासून सीटीएस परीक्षेमध्ये मुलीच बाजी मारताना दिसत आहे .साक्षी ही कामठा बेलखेड तालुका कारंजा लाड येथील रहिवासी असून अतिशय गरीब कुटुंबातील आहे वडिलांचा ऑटो चालवण्याचा व्यवसाय आहे .साक्षीला उच्च शिक्षणाची आवड असतानाही परिस्थितीमुळे आयटीआय करावी लागले .साक्षीची शिक्षण जिल्हा परिषद शाळा कायरगांव येथे झालेली असून तिला तीन बहिणी  असा परिवार आहे.

2019- 21 या सालात साक्षी आयटीआय कारंजा येथे वीजतंत्री व्यवसायामध्ये प्रवेश मिळाला. तिची चुलत वहिनी आयटीआय करण्यासाठी तिला नेहमी प्रेरणा देत होते.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा  मध्ये भारतातून मुलींनी पहिला क्रमांक पटवण्याची ही पहिलीच वेळ आहे. साक्षीचा सिटीएस या परीक्षेमध्ये यश प्राप्त केल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त महानिदेशालय दिल्ली तर्फे आयटीआय कारंजा येथे ऑनलाईन सेमिनार द्वारे तिचे सत्कार करण्यात आले.

 तसेच 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्य धनज सर्कल मधील समाजसेवक, जिल्हा परिषद सदस्य श्री चंदभाऊ  डोईफोडे यांनी साक्षी आणि तिचे आई-वडील यांचे घरी प्रत्यक्ष जाऊन पुष्पहार देऊन त्यांचे सत्कार केले.तसेच परिसरामध्ये साक्षीचे सर्वत्र सत्कार आणि गौरव करण्यात येत आहे. साक्षी ही भारतातून तिसरी आल्याने शंकराव ऑटो रिक्षा वाल्याची  ओळख आता साक्षीचे वडील म्हणुन सन्मान मिळत आहे.त्यामुळे साक्षीच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे

साक्षी तिच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील, आणि वहिनी आणि प्रशिक्षक शिल्पनिदेशक  श्री चांदेकर सर तसेच संस्थेचे प्राचार्य  यांना देत आहे.साक्षी शेषराव वरठी ही विजतंत्री ट्रेड मधुन भारतातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आणि मुलीतुन पहीली आल्याने संस्थामध्ये महीला दिनी संस्थेचे प्राचार्य श्री.व्ही.डी.राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच तिचे शिल्पनिदेशक श्री.चांदेकर सर यांच्या अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या.

तसेच अमरावती विभागातून सीटीएस परीक्षेमध्ये यश संपादन केल्यामुळे श्री पुरुषोत्तम देवतळे साहेब सहसंचालक प्रादेशिक कार्यालय अमरावती तसेच साहाय्यक संचालक श्री नरेंद्र येते यांनी भ्रमणध्वनीद्वारे कुमारी साक्षी वरठी हिला शुभेच्छा सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

1 Comments

Unknown said…
Congratulations....sakshi