Advertisement

आयटीआय दत्तक गांव सरोदे नगर येथे हर घर तिरंगा मोहीम यशस्वीपणे संपन्न-प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम

 आयटीआय दत्तक गांव सरोदे नगर येथे हर घर तिरंगा आयटीआय पांढरकवडाची मोहीम यशस्वीपणे संपन्न.

आयटीआय दत्तक गांव सरोदे नगर येथे हर घर तिरंगा  मोहीम यशस्वीपणे संपन्न-प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम

अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबण्यात येत आहे त्यातीलच एक भाग म्हणून आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आयटीआय पांढरकवडा ते सरोदे नगर पर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा रॅलीला संस्थेचे प्राचार्य श्री महेशकुमार दयानंद सिडाम यांनी हिरवी झेंडी दाखवून  सुरुवात करण्यात आले.

आयटीआय दत्तक गांव सरोदे नगर येथे हर घर तिरंगा  मोहीम यशस्वीपणे संपन्न-प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम

हर घर तिरंगा घर घर तिरंगा रॅली सरोदे नगर गावात पोहोचताच गावातील ज्येष्ठ नागरिक सरपंच श्री देविदास शिंदे यांनी प्राचार्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .आणि तिरंगा रॅलीला शुभेच्छा दिल्या प्रथम रॅलीचे संपूर्ण गावात फेरी मारण्यात आले आणि प्रत्येकांच्या घरी आयटीआय पांढरकवडा  येथील सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी घरोघरी जाऊन तिरंगा लावला. आणि प्राचार्य महेशकुमार सिडाम यांच्या हस्ते प्रत्येकाच्या घरी मिठाच्या बॉक्स वाटप करण्यात आले.

आयटीआय दत्तक गांव सरोदे नगर येथे हर घर तिरंगा  मोहीम यशस्वीपणे संपन्न-प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम

अशा प्रकारचा उत्सव सरोदे नगर गांव प्रथमच वेगळेपणा दिसून येत आहे असे मत सरोदे गावातील महिलांनी व्यक्त केले मिठाईचे बॉक्स बघून बालगोपाल मंडळीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होते .प्रत्येकाच्या घरी तिरंगा लावून झाल्यानंतर प्राचार्य यांनी त्यांचे अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आयटीआय मार्फत मोफत घरगुती फिटिंग शेतातील पाण्याची पंप किरकोळ दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. शेवटी तिरंगा रॅलीचे आयटीआय मध्ये समारोप करण्यात आले आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थींना  स्नेहभोजन देण्यात आले.



हर घर तिरंगा रॅलीमध्ये विशेष परिश्रम श्री जी एस पाटील गटनिदेशक, श्री माणिक केवटे, श्री एन के राठोड, श्री चंद्रशेखर टेंबे, श्री.शरद आसोले, श्री सुधीर बनसोड, सौ.करूणा सुधीर बनसोड, सौ मंगला मडावी,सौ. माया नरांजे, श्रीमती वैशाली भोयर ,श्री.पंकज लोणारे,कु.मोनाली सेंगर,कु.वैष्वीनी कुबडे,कु.योगिता चव्हाण,कुंडलिक आत्राम,श्री.सचिन बोरतवार,श्री.विशाल अरगुलवार,श्री.सुरज टापरे, ज्ञानेश्वर आत्राम,श्री‌.दयानंद आत्राम,श्री.राजु म्हस्ते,श्री.अनिल नव्हाते,श्री.सुरेश गहुरकार,श्री.हमराज जेधे, सर्व मेस्को सिक्युरिटी यांनी केले.



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments