Advertisement

आय टी आय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? अर्ज करावयाचा आहे का? अर्ज कसा करावा

आय टी आय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? अर्ज करावयाचा आहे का? अर्ज कसा करावा

आय टी आय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? अर्ज करावयाचा आहे का? अर्ज कसा करावा


 दहावी,बारावीचा निकाल जाहीर झाला आहे,परीक्षेत मिळालेल्या गुणा नुसार  आणि आपल्या पसंतिक्रमांकनुसारच प्रत्येक उमेदवार औद्योधिक प्रशिक्षण संस्था (ITI)मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक  नक्कीच असणार आहात? आय टी आय मधील अभ्यासक्रम हे सर्वात जास्त रोजगार आणि स्वयंरोजगराच्या संधी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे अर्ज करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

तसेच फी फारच कमी आणि अभ्यासक्रमाचा कालावधी  सुद्धा एक आणि दोन वर्षे असल्याने इतर कोर्सचा विचार करता फारच कमी आहेत ,तसेच प्रचंड प्रमाणात रोजगार स्वरोजगराच्या संधी उपलब्ध असल्याने उमेदवाराची ओढ आय टी आय च्या दिशेने जात आहे.रोजगारमुख शिक्षण म्हणून आय टी आय चा नावलौकिक होत आहे.       


आय टी आय प्रवेश प्रक्रिया ही दहावी निकाल लागल्यावरच ,तसेच आपले कितीही उच्च शिक्षण झाले असले तरीही 10वि मध्ये पडलेल्या गुणा नुसार प्रवेश प्रक्रिया होते.तर काही मोजक्याच व्यवसायासाठी दहावी नापास असेल तरीही प्रवेश गुणवत्तेनुसार होत असतो.तसेच अर्ज करण्याची  मुदत ठरलेली असते आणि त्या मुदतीतच अर्ज करणे आवश्यक असते. ह्याचेही भान ठेवणे खूप गरजेचे आहे.याबाबत कोणत्याही नजीकच्या शासकीय आय टी आय ला भेट दिल्यास सर्व आवश्यक म्हाहिती मिळू शकते. नाहीतर

https://admission.dvet.gov.in/ ह्या संकेत स्थळावर सर्व म्हाहिती उपलब्ध आहे, असते.अर्ज भरण्याची प्रक्रिया ही  पूर्णतः ऑन लाईन centralaised पद्धतीने असते,अर्ज भरून झाल्यावर शासनाने ठरवून दिलेल्या फी नुसार ती फी भरून जवळच्या कोणत्याही iti मध्ये confirmation करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने confirmation असल्यास ते करणे बंधनकारक राहील. न केल्यास गुणवत्ता यादी मध्ये नाव येणार नाही आहे.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची पद्धत पूर्णतः बंद झालेली आहे, तसेच वशिलेबाजी,शिफारस ह्याला कुठेही वाव राहत नसून पूर्णतः पारदर्शक पद्धतीनेच "ओंनलाईनच" प्रवेश प्रक्रिया पार पाडत असते ,त्यामुळे कोणीही कोणाच्या आमिषाला बळी न पडणे हे उत्तम राहील,रहावेच.


तरीही काही पालक वर्ग अर्ज कधी सुटतील?फॉर्म कुठे मिळेल? असे अनेक प्रश्न सतत विचारत असतात,सतत आय टी आय मध्ये फेऱ्या मारीत असतात,तो किमान त्रास कमी होवा, ऑनलाइन अर्ज भरताना बऱ्याच चुका होऊ शकतात , त्या कमी होव्यात,त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी अर्ज बात ठरून प्रवेश रद्द,नाकारला जाऊ शकतो,पर्यायाने वर्ष वाया जाणे,प्रचंड मनस्ताप होणे,तसेच आपल्याला हवा तो व्यवसाय अर्ज भरताना केलेल्या चुकामुळे न मिळणे,

 कदाचित त्या व्यावसायपासून  वंचित राहावे लागते . सदर त्रास होऊ नये म्हणून संस्था निहाय निवड यादी जाहीर होण्यापूर्वी राज्याची एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते त्यावेळी अनावधानाने, चुकून अर्ज भरताना चुका झाल्यास सुधारण्यासाठी एक ते दोन दिवसाचा अवधी  अर्जदाराला दिलेला असतो, त्याचा सुद्धा पुरेपूर फायदा अर्ज करणाऱ्या उमेदवार घेऊन पुढे येणाऱ्या अडचणी रोखण्यास मदत होते.               


तरी सर्वांनी प्रथम ज्यांना *जातीचा दाखला* आवश्यक त्यांनी तो दाखला जो विद्यार्थी आय टी आय मध्ये प्रवेश घेणार त्याच्याच नावाने काढणे आवश्यक आहे ,तरच आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे,   प्रत्यक्ष प्रवेशावेळी वडील किव्हा भावंडांचा दाखला घेऊन येतात मात्र असा दाखला चालत नसल्याने प्रवेशाला मुकावे लागते,    ओबीसी,विमुक्त भटकी जमात, विशेष मागास प्रवर्ग ह्यांना जातीच्या दाखल्या सोबत *नॉन क्रिमिलयेर* दाखल्याची आवश्यकता असतो त्यामुळे तो सुद्धा काढणे आवश्यक असते,  

दरम्यान सर्वच ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने त्यावेळी आवश्यक दाखले मिळण्यास प्रचंड उशीर होतो,पर्यायाने प्रवेशाच्या वेळी दाखले वेळेवर मिळत नाहीत ,त्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.*तसेच जिल्हा,राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळात भाग घेऊन प्राविण्य मिळविल्यास त्याचे संबंधित क्रीडा अधिकारी ह्यांच्याकडून प्राप्त सर्टिफिकेट जोडल्यास काही विशेष गुण मिळतात* .

त्याचा फायदा मेरिट वर जाण्यास नक्कीच फायदा होतो,त्यामुळे वरील  दाखले प्रत्यक्षात असणे आवश्यक आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना त्याचा तसा न विसरता त्या वेळी उल्लेख करणे आवश्यक आहे.तसेच सोबत          

 * शाळा सोडल्याचा दाखला, डुप्लिकेट असल्यास काढण्यास लागलेली सर्व कागदपत्रे,10 वि गुणपत्रक,इतर खेळ,अपंग  असल्याचे पुराव्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त  प्रमाणपत्र,आधार कार्ड,राष्ट्रीय बँकेतील बचत खाते,अधिनिवास दाखला,4फोटो* असल्यास इंटर मेडिअट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र,त्याचे अवांतर 10 गुण अधिक मिळतात मात्र इतर आवश्यकच असणार आहे.

 वर उल्लेख केलेल्या सर्व दाखल्याची  मूळ प्रत नि झेरॉक्स  प्रति प्रत्यक्ष प्रवेशावेळी पूर्तता करणे आवश्यक असणार आहे,ह्या बाबत पालक आणि पाल्यानी खूप बारकाईने अर्ज विचारपूर्वक भरणे आवश्यक आहे. अर्ज भरून झाल्यावर बरेच उमेदवार अर्जामध्ये व्यवसाय प्राधान्यक्रम पसंतिक्रम देतच नाही, पर्यायाने त्याचा गुणवत्तेमध्ये नाव येत नाही,पर्यायाने फार मोठे नुकसान होते.                                           

 अर्ज भरताना विशेषतः खालील चुका होतात नि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी सस्था स्तरावर तपासणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येतात ,त्यावेळी कोणतीही अनावधानाने अर्ज भरताना झालेल्या चुका त्वरित बदलण्याची,सुधारण्याची संधी नसते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते तरी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना पुरुष/स्त्री हे योग्य रीतीने निवड करणे आवश्यक आहे,

एखाद्या पुरुष प्रवर्गातील मुलाने अर्ज भरताना चुकून किहवा अनावधानाने स्त्री(female) निवड केली तर मुली साठी राखीव असलेल्या कोट्या मधून गुण कमी असून सुद्धा त्याच्या गुणवत्तेमध्ये नंबर लागेल मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ही बाब लक्षात येणार नि त्या फेरीमधून प्रवेश प्रक्रियेमधून बात होणार तरी वरील काळजी घेणे गरजेचे आहे

,तसेच काही जिल्हा,राज्य,राष्ट्रीय स्तरावर कोणताही खेळ खेळलेला नसताना,सर्टिफिकेट उपलब्ध नसताना,अपंग नसूनही(handicapped) तसेच अनाथ(orphan) नसून वैगरे अर्ज भरताना येस(☑️) म्हणून निवड करतात त्यामुळे त्या मुलाचे त्यासाठी असलेले अवांतर गुण मिळून गुणवत्तेत वाढ होते किहवा अपंग ,अनाथ मुलांसाठी असलेल्या आरक्षणाच्या लाभ मिळतो मात्र प्रत्यक्षात असे कोणतेही सर्टिफिकेट नसते किहवा वस्तुस्थिती सुद्धा नसते त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेशावेळी ह्यासर्व बाबी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येतात आणि प्रवेश प्रक्रिये मधून बात होवे लागते तरी ह्याची अर्ज भरताना सर्वांनीच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.अचूक म्हाहितीच भरणे गरजेचे असणार आहे चुकीला माफी नाही आहे.


 तसेच गुणवत्ता यादीमध्ये नंबर येतो तो आपल्याला परीक्षेला पडलेल्या गुणसंख्येमुळे,मात्र अर्ज भरताना बऱ्याच मुलांकडून मार्क 100की 150 पैकी हे गुणपत्रिकेवर न बघता मार्क भरले जातात तसेच प्रत्येक विषयामध्ये सुद्धा पडलेले गुण सुद्धा जे गुणपत्रिकेवर आहेत ते बघून बारकाईने भरणे आवश्यक आहे,चुकून वेगळे,किहवा कमी जास्त गुण भरले तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी निदर्शनास येऊन प्रवेश बात होऊ शकतो,

 तसेच काही मुले ही 11वि किहवा इतर ठिकाणी प्रवेश घेतात,प्रवेश झाल्यावर मूळ शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी जमा करतात,मात्र त्याच दरम्यान आय टी आय मध्ये गुणवतेनुसार नंबर लागल्यास डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला घेऊन येतात,एकाच वेळी दोन ठिकाणी प्रवेश घेणे,तसेच दाखला ना हरविता सुद्धा डुप्लिकेट दाखला देऊन प्रवेश घेण्याचा काही जणांकडून प्रयत्न केला जातो मात्र हा फार मोठा गुन्हा आहे तरी असा कोणीही प्रयत्न करू नये तसेच खरच गहाळ,हरविले असल्यास योग्य ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रवेशावेळी सर्व दस्त ऐवज सादर करणे बंधनकारक असणार आहे.

तरी वरील सर्व मुद्द्याची स्वतः पालक आणि पाल्याने अर्ज भरतानाच काळजी घेणे आवश्यक आहे. बरीच मुले *सायबर कॅफे* मध्येच अर्ज भरतात मात्र अर्ज भरून झाल्यावर प्रिंट काढून घेऊन तशीच ठेवतात ,मात्र त्यात काही चुका आहेत का?त्याचा त्याच वेळी निदर्शनास आल्या तर  निवड यादी लागण्यापूर्वी दुरुस्त करणे शक्य असते मात्र प्रत्यक्ष प्रवेशावेळी ह्या चूका निदर्शनास येऊन नुकसानच होते हे टाळण्यासाठी काटेकोरपणे अर्ज भरणे किहवा भरून घेणे आवश्यक आहे.तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून सर्व भरलेली म्हाहिती बारकाईने तपासणे खूप महत्वाचे तितकेच गरजेचं आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईस्तव रेंज नेहमी असते,असेल अश्याच कंपनीचा  मोबाईल नंबर रजिस्टर करावा, तसेच प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत किहवा प्रवेश निश्चित होईपर्यंत मोबाईल बंद ठेवू नये,नंबर बदलू नये तसेच कार्डही बदलू नये,ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेचे सर्व मेसेज ज्या नंबरने रजिस्टर कराल त्याच फोन नंबर वर आपल्याला प्रत्येक गुणवत्तेच्या फेरीनुसार कळणार आहेत.तरी सर्वांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज काळजीपूर्वक भरावा तसेच सर्व प्रवेश प्रक्रियेपूर्वीच सर्व आवश्यक दाखले काढून ठेवणे गरजेचे आहे.      

 

तसेच ज्याची दहावी पर राज्यात झालेली आहे त्यांनी ssc बोर्डाच्या कार्यालयाकडून आपले गुणपत्रक बदलून घेणे आवश्यक आहे,त्याच्या मूळ गुणपत्रकानुसार प्रवेश मिळणार नाही तसेच तीन फेऱ्या नंतरच प्रत्यक्ष मेरिट यादी मध्ये पर राज्यातील उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाते हे सुध्दा पर राज्यात ज्याची दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले आहे त्याच्या साठी खूपच महत्वाचे आहे.

*तसेच व्यवसायाचे ऑप्शन(पसंतिक्रम) भरताना सुद्धा खूपच काळजी पूर्वक भरणे आवश्यक आहे,जर पहिला व्यवसाय' पहिल्या क्रमांकावर भरल्यावर गुंणत्तेनुसार पहिल्या फेरीत प्रवेश मिळत असल्यास घेणे बंधनकारक असेल ,नाही घेतल्यास प्रवेशप्रक्रियेमधून बात होणार आहे,दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या तीन ऑपशन पैकी कोणताही ऑपशन च्या ट्रेडला प्रवेश मिळाला तरी घेणे बंधनकारक असणार आहे,

तसेच पुढच्या फेरीत पहिल्या 5मधील पसंतिक्रमास प्रवेश मिळत असल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.त्यापुढे च्या फेरीत100ऑपशन टाकल्यास त्या पैकी ज्या ट्रेंड ला मिळेल त्याला प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल, 

तसेच संस्थेमधील रिक्त असंणाऱ्या जागेवरून फेऱ्याची संख्या वाढते,तसेच कधीतरी ठराविक मुदतीत अर्ज न केल्याल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करण्याची किव्हा सुरवातीस अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना सुद्धा भविष्यात संधी मिळू शकते मात्र पसंती नुसारच व्यवसाय मिळेल असे अजिबात नाही.

एकच अर्ज राज्यभरातील कोणत्याही शासकीय आय टी आय साठी चालू शकतो मात्र अर्ज भरताना त्या त्या आय टी आय चे नाव,तसेच त्या आय टी आय मध्ये असलेले व्यवसाय ,स्वतःचा पसंतिक्रम नमूद करणे आवश्यक असते, 

सदर सर्व म्हाहिती फॉर्म भरताना निदर्शनास येते,त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही .सर्व व्यवसायासाठी मागासवर्गीय उमेदवार सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत असल्यास फक्त वार्षिक 950 रुपये आणि इतर ट्रेड नुसार 

खुल्या प्रवर्गासाठी वार्षिक 1950,

2950 आणि 3350 एवढीच असते.

तसेच अर्ज भरताना किव्हा काही कळत नसल्यास जवळच्या कोणत्याही शासकीय आय टी आय मध्ये संपर्क केल्यास आवश्यक म्हाहिती मिळू शकतadmission. dvet.gov.in या संकेत स्थळावर सर्व म्हाहिती उपलब्ध असते,तसेच सर्व update  त्या ठिकाणी गेल्यास पाहायला मिळतील.


तसेच राज्यस्तरीय गुणवत्ता यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध होते तेहवा आपलं नाव नसेल,काही अर्ज करताना काही अनावधाने चुका झाल्यास शेवटची संधी असते मात्र त्यानंतर संस्था निहाय यादी प्रसिद्ध होयला सुरवात झाली की लगेच सुधारणा करता येत नाही त्यामुळे ह्या कडे फार गाभिर्याने बघणे आवश्यक आहे.इतर ठिकाणच्या सुद्धा प्रवेश प्रक्रियेसाठी बहुतांश हीच पद्धत अवलंबली जात असते.   सदर सर्व म्हाहिती 

https://admission.dvet.gov.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.              

 जी.आर. कर्पे ,                

गणित  तथा चित्रकला निदेशक, आय टी आय मुंबई 11 भायकाला,7977105235



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments