आयटीआय पांढरकवडा येथे परिसर मुलाखतीतून वेगवेगळ्या कंपनीमध्ये 75 मुलांची निवड
शासकीय औद्योगिक संस्था आदिवासी पांढरकवडा दिनांक २३ ऑगस्ट रोजी रोजगार आपल्या व्दारी योजना अंतर्गत पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपनीना पाचारण करण्यात आले होते त्यामध्ये ऋचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, ऐई सिआयई इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, फिनोलेक्स इंडस्ट्रीज पुणे, हयोसुंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड, यांचा समावेश होता. शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
रोजगार भरती मेळाव्याचे अध्यक्ष श्री गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ येथे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गजेंद्र पाटील गटनिदेशक, श्री एन के राठोड ,श्री विजय भदीरंगे, उपस्थित होते तसेच कंपनीचे एच. आर.या भरती मेळावा करीता उपस्थित होते या प्रसंगी ही प्रज्वलन करून मेळाव्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
रोजगार भरती मेळावा करिता विजतंत्री ,यांत्रिक मोटार गाडी ,फिटर, वायरमन ,वेल्डर ,यांत्रिक डिझेल या व्यवसायाचे एकूण 81 उमेदवार भरती मिळावा करता हजर होते .तर त्यापैकी 75 उमेदवारांना प्रत्यक्ष वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्रत्यक्ष निवड पत्र देण्यात आले .निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेचे प्राचार्य यांनी कंपनीचे एच. आर.यांच्या आभार मानले तसेच निवड झालेल्या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या अध्यक्ष भाषणातून शुभेच्छा दिल्या.
शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा करीता विशेष परिश्रम श्री कुंडलिक आत्राम, श्री सचिन बोरतवार, श्री दुर्योधन नारनवरे ,श्री मार्गदिप भाटशंकर, श्री किरण राठोड, श्री गणेश देठे ,श्री माणिकराव केवटे,श्री.मदन दुगड ,श्री शैलेश चव्हाण ,श्री किशोर नारंगे,श्री.सुरज टापरे,श्री.श्री.विष्णु पवार,श्री.अशिष माटे,श्री.अतुल जाधव,दयानंद आत्राम ,श्री.विशाल अरगुलवार ,सौ.करुणा सुधिर बन्सोड,सौ.मंगला मडावी,कु.योगिता चव्हाण.सौ.संध्या अर्धापुरकर कु.मोनाली सेंगर,श्री.निलेश पिट्लवार श्री भोंगे नी केले
तसेच भरती मेळावा मध्ये उपस्थितांना भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.या शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळाव्याचे सुत्रसंचलन श्री.शरद आसोले समन्वयक यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.सतिश बोबडे यांनी केले.यावेळी संस्थेतील ईतर प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थिती होती.
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments