✨ संघर्षातून यशाकडे ✨
आयटीआय वणी येथील राकेश
राजेश किटकुले यांची सुतारकाम निदेशक पदापर्यंतची प्रेरणादायी यशोगाथा
“अडचणी आल्यावर थांबायचं नसतं,
तर
स्वतःला अधिक मजबूत करायचं असतं.”
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), वणी, जिल्हा यवतमाळ येथील सुतारकाम
ट्रेडमधील प्रशिक्षणार्थी राकेश
राजेश किटकुले यांची महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती
कारागृहात सुतारकाम निदेशक पदावर झालेली निवड ही केवळ एक नोकरी नसून, ती संघर्षावर मिळवलेली विजयाची मोहर आहे.
भीम नगर, वणी
येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राकेश यांचे शिक्षण विवेकानंद विद्यालय, वणी येथे झाले. घरची
परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील रोजंदारीवर काम करून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण
करत होते.
“परिस्थिती कितीही कठीण असली,
स्वप्न
पाहण्यावर कुणाचंही बंधन नसतं.”
दहावीच्या परीक्षेत केवळ 48% गुण मिळाले. अनेकांसाठी हा अपयशाचा शेवट
असतो, पण
राकेशसाठी तो नव्या प्रवासाची सुरुवात ठरला. त्यांनी स्वामी विवेकानंद अभ्यासगट, वणी येथे नियमित अभ्यास सुरू
केला. कष्ट, चिकाटी
आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर 2021 मध्ये बारावीमध्ये 75% गुण मिळवले. पुढे मुक्त
विद्यापीठातून बी.ए.
शिक्षण पूर्ण
केले.
“मार्ग बदलू शकतो,
पण
ध्येय कधीच बदलायचं नसतं.”
मित्रांच्या सल्ल्याने राकेश यांनी ITI करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये त्यांनी ऑनलाईन अर्ज
केला; मात्र
दहावीतील कमी टक्केवारीमुळे सर्व फेऱ्या संपूनही प्रवेश मिळाला नाही. अनेकजण इथेच
हार मानतात, पण
राकेश थांबले नाहीत. एका शिक्षकांनी दिलेल्या स्पॉट अॅडमिशनच्या माहितीनुसार ते यवतमाळ ITI मध्ये पोहोचले.
रात्री अडीच
वाजता त्यांच्या नंबर आले आणि—
“फक्त
सुतारकाम ट्रेड शिल्लक आहे, घ्यायचा का?”
क्षणाचाही
विचार न करता राकेश यांनी होकार
दिला.
“संधी लहान असली तरी,
तिला
स्वीकारणारा माणूस मोठा असतो.”
सुतारकाम ट्रेडमध्ये प्रवेश मिळाल्याचा आनंद म्हणजे जणू नोकरीच
लागल्यासारखा होता. याच ठिकाणी त्यांच्या जीवनातील खरा टर्निंग पॉईंट सुरू झाला.
ITI वणी येथे रेग्युलर
सुतारकाम ट्रेड करताना
त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि 85% गुणांसह ट्रेड उत्तीर्ण झाले. पण नियतीने पुन्हा
एकदा कठीण परीक्षा घेतली.
त्यांचे वडील काळाच्या पडद्याआड
गेले.
“डोळ्यांत अश्रू असतानाही,
पाय
थांबू न देणं म्हणजे खरा संघर्ष.”
घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मोठ्या भावाने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू
केला. आईला मानसिक धक्का बसून पुढे पॅरालिसिसचा झटका आला. जवळपास एक वर्ष राकेश
यांनी आईची सेवा, घरकाम
आणि स्वतःचा अभ्यास सांभाळत संघर्ष केला.
आईचे एकच स्वप्न होते—
“माझ्या
मुलाला सरकारी नोकरी लागली पाहिजे.”
“आईचं स्वप्न म्हणजे,
मुलाच्या
जीवनातील सर्वात मोठं ध्येय.”
आईच्या या शब्दांनीच राकेश पुन्हा उभे राहिले. त्यांनी MA अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 2023–24 मध्ये महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती
कारागृहात सुतारकाम निदेशक पदासाठी अर्ज केला. परीक्षा दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून
तिसरा क्रमांक मिळवून
यश संपादन केले. मुलाखतीतही ते यशस्वी ठरले.
“जे संकटांना घाबरत नाहीत,
तेच
इतिहास घडवतात.”
🎉 ऑगस्ट 2025 मध्ये नाशिक विभागातील
महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुतारकाम निदेशक पदावर त्यांची नियुक्ती
झाली.
यशाच्या त्या क्षणी वडील सोबत नसल्याची वेदना होती; पण मुलाच्या यशाने आईचे
डोळे आनंदाश्रूंनी भरले.
राकेश म्हणतात—
“मी
एम.ए. करूनही कदाचित बेरोजगार राहिलो असतो. पण आयटीआय सुतारकाम ट्रेडमुळे माझे
स्वप्न पूर्ण झाले. आज मला या ट्रेडची खरी किंमत कळली.”
नियुक्तीनंतर स्वामी
विवेकानंद अभ्यासगट, वणी आणि शासकीय ITI वणी येथे त्यांचा सत्कार
करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य श्री. विनोद नागोरे आणि श्री.
वनकर सर यांनी
त्यांच्या कर्तृत्वाचे भरभरून कौतुक केले.
“यश कुणाचंही एकट्याचं नसतं,
त्यामागे
अनेक हातांची साथ असते.”
या यशाचे श्रेय राकेश आपल्या आई-वडील, मोठा भाऊ, स्वामी विवेकानंद अभ्यासगट, तसेच प्राचार्य विनोद नागोरे व मार्गदर्शक आणि प्रशिक्षक विजय वनकर वेल्डर निदेशक यांना
देतात.
✨ प्रेरणादायी संदेश ✨
“मित्रांनो, आयटीआय सारखे उपयुक्त
शिक्षण नाही. सुतारकामासारखा हलका समजला जाणारा व्यवसाय मला सन्मानजनक सरकारी
नोकरी देऊ शकतो, तर
तुम्हीही आयटीआयचा मार्ग स्वीकारा आणि आपल्या स्वप्नांना दिशा द्या.”
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments