आयटीआय मध्ये ऑगस्ट 2023 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आणि आधारकार्ड बॅक खातेशी लिंक करणे आवश्यक
शासनाने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशित होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या एकूण रुपये आठ लाख एवढ्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये रुपये ५०० प्रतिमाह एवढे विद्यावेतन देण्याचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ च्या प्रवेश प्रक्रियेमधील पोस्ट ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये प्रवेशित होणान्या
सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे आधार संलग्न बैंक अकाउंट व बँकेचा आयएफएससी कोड नोंदवण्यासाठी सुविधा
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपल्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना वर्ष ऑगस्ट, २०२३ मध्ये प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते तात्काळ उघडण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात.
तसेच अशा प्रकारचे खाते उघडण्यासाठी संस्थेच्या परिसरातील राष्ट्रीयकृत बँकेची भेट घेऊन बँकेमार्फत संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थ्याचे खाते उघडण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. विद्यावेतन अदा करण्याची कार्यवाही डीबीटी पोर्टलवरून होणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे. यामुळे वरील बाबीस प्राधान्य देण्यात यावे.
ITI Admission Link- https://admission.dvet.gov.in/
Mahadbt Link- https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
शासनाचे परिपत्रक- येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments