Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रचारासाठी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

आयटीआय पांढरकवडा येथे कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रचारासाठी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

आयटीआय पांढरकवडा येथे कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रचारासाठी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
 पुरुष गट व महिला गट विजेते

१७ सप्टेंबर विश्वकर्मा भगवान जयंती आणि भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राज्यातील ४१७ आयटीआय मध्ये कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा हैदराबाद हायवे श्रीसाई सिमेंट प्रॉडक्ट ते आयटीआय पांढरकवडा असे ठेवण्यात आले होते. सुरुवातीस युवा फाउंडेशन आणि मित्र क्रीडा मंडळातील पंच म्हणून कु. पायल गाऊत्रे आणि अजय जाधव यांनी स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या आणि श्री गजानन राजुरकर संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रत्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आले.

आयटीआय पांढरकवडा येथे कौशल्य शिक्षणाचा प्रचार व प्रचारासाठी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा ही सर्वांसाठीच खुली असल्यामुळे स्थानिक कॉलेजेस आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये

 पुरुष गटातून

  1.  धनराज महादेव आडे प्रथम क्रमांक -३००० बक्षीस
  2.  विशाल महादेव टेकाम व्दितीय क्रमांक - २००० बक्षीस
  3. प्रथमेश देविदास नैताम तृतीय क्रमांक- १००० बक्षीस

पटकाविला  त्यांना कौशल्य मंत्रालय राज्य शासनाकडून प्रथम ३०००, व्दितीय २००० बक्षीस व तृतीय १००० बक्षीस व प्रशस्तीपत्र श्री.मनोज उघडे पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन पांढरकवडा यांच्या हस्ते देऊन त्यांचे सन्मान संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.तर

महिला गटातून

  1.  कु.किरण  वसंता किनाके प्रथम क्रमांक,प्रथम क्रमांक -३००० बक्षीस
  2.  कु. पायल संतोष टेकाम व्दितीय क्रमांक व्दितीय क्रमांक - २००० बक्षीस
  3.  कु. निकिता गजानन पाथोडे  तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक- १००० बक्षीस

 पटकाविला त्यांना प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, व्दितीय  बक्षीस दोन हजार रुपये ,तृतीय बक्षीस एक  हजार असे बक्षीस देऊन कौशल्य मंत्रालय  यांच्यामार्फत प्रशस्तीपत्र श्री.मनोज उघडे पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन पांढरकवडा यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.

पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धाकरिता २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला उर्वरित विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी झाल्याबाबत त्यांना ऑनलाईन कौशल्य मंत्रालय महाराष्ट्र राज्यशासन यांच्याकडून  प्रमाणपत्र त्यांच्या मेल आयडीवर देण्यात आले.

सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता  विशेष योगदान आशिष माटे, एन .के. राठोड, सतीश बोबडे, शरद आसोले ,सचिन बोरतवार, किरण राठोड, शैलेश चव्हाण, गणेश देठे,  माणिक केवटे ,सुधीर बनसोड, सौ.करुणा सुधीर बनसोड, मार्गदिप भाटशंकर, कुंडलिक आत्राम,निलेश पिट्लवार,विशाल अरगुलवार,कु.योगिता चव्हाण,कु.वैषन्वी कुबडे,अमर विहरे सहायक अधिव्याख्याता,विजय भदीरंगे, विष्णू पवार,कीशोर नारींगे,दुर्योधन नारनवरे,एन.एस‌.भोंगे सुरज टापरे,अतुल जाधव,दयानंद आत्राम,आशिष नव्हाते, दिलीप जपंवाड, तसेच गणेश पिन्मवार मेस्को सिक्युरिटी स्टाफ यांनी केले.



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments