आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय युवा दिन तथा स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
शासनाने प्रथमच राज्यामध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्य साधून स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव शिबिराचे राज्यातील संपूर्ण आयटीआय मध्ये मा. मंगल प्रभात लोढा ,मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीनत्या विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे प्राचार्य राहुल पाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गंगाधर सोनबाजी आत्राम नवनियुक्त सदस्य आयएमसी ऑफ वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा यांनी स्थान भूषविले होते.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे गटनदेशक श्री. जी .एस .पाटील आणि श्री. एन.के राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शिबीरांचे प्रास्ताविक एन.के.राठोड यांनी केले
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवांच्या जबाबदाऱ्या तसेच स्वामी विवेकानंद यांचे युवा प्रति मार्गदर्शनपर विचार या विषयावर श्री. नरेंद्र एस. नारलावार एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर केळापूर यांचे व्याख्यानाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराच्या संधी या विषयावर श्री. सचिन उत्तम बोरतवार यांचे मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी संस्थेमध्ये तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि प्राविण्य प्राप्त करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगाधर आत्राम यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशिक्षणार्थ्यांना गौरविण्यात आले.
संस्थेतून पास आऊट होऊन रोजगार स्वयंरोजगार करणाऱ्या यशस्वी माझी प्रशिक्षणार्थी मोहम्मद पोसवाल वेल्डर,प्रेमसिंग चव्हाण महावितरण,संजय लक्ष्मण आत्राम महावितरण, लक्ष्मण गुरुनुले,रोशन वनकर महावितरण,कु.आशा ढवस, महावितरण,कु.सुवर्णा सोयाम महावितरण,कु.कविता करवते महावितरण, आणि सोहेल बेग मिर्झा वेल्डर यांचे मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.आणी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम श्री सुधीर बनसोड, श्री अतुल जाधव, श्री किशोर नारिंगे, श्री मार्गदीप भाटशंकर, श्री गणेश फुटाणे, श्री आकाश सोनवणे, श्री कुंडलिक आत्राम, श्री.सुरज टापरे, श्री. विशाल अर्गुरवार,यांनी केले.तर स्वामी विवेकानंद महोत्सव मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन श्री किरण राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.कल्याणी भोकरे यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले. याप्रसंगी संस्थेतील सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments