आयटीआयची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
आपला देश सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना दिसत आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास, उद्योजक्ता व नावीन्यता विभागाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पलीकडे जात आता आय टी आय मध्ये नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांवर आधारित अभ्यासक्रमांची भर घातली जात आहे.
डिजिटल भारतासाठी नवीन दिशा
'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'सेमीकंडक्टर मिशन', आणि 'स्टार्टअप इंडिया' या उपक्रमांमुळे देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात क्रांती होत आहे. मोबाईल, स्मार्ट डिव्हाइसेस, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, ड्रोन, सोलर पॅनल्स, आणि एआय तंत्रज्ञान आधारित प्रणाली ही आता भारताच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत चालली आहेत. या क्षेत्रांमध्ये स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
आय टी आय मध्ये नवयुगीन कोर्सेसची भर या शैक्षणिक वर्षा पासून केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील अनेक आय टी आय मध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत:
१) इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्निशियन :-
यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट, EV चार्जिंग स्टेशन, मोटर कंट्रोल सिस्टीम आणि मेंटेनन्स यासारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
२) रोबोटिक्स आणि ऑटोमेशनः यामध्ये विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रोबोट्सची रचना, प्रोग्रॅमिंग व देखभाल करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
३) ड्रोन टेक्निशियनःया व्यवसायात ड्रोन असेंब्ली, ड्रोन ऑपरेशन्स, एरियल मॅपिंग, कृषी व सिव्हिल क्षेत्रातील वापरासंबंधिचे प्रात्यक्षिक करून शिकविले जाते.
४) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा अॅनालिटिक्सः या अभ्यासक्रमा अंतर्गत मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आणिख ऑटोमेशन यामध्ये प्रवेशद्वार ठरणारे तयार करा आणि वापरा हे प्रायोगिक प्रशिक्षण दिले जाते.
५) श्री-डी प्रिंटिंग टेक्निशियनः या अभ्यासक्रमात
CAD डिझाईनपासून प्रोटोटायपिंग म्हणजे कोणत्याही वस्तूचे प्रतिरूप तयार करणे शिकविले जाते. हा उत्पादन यंत्रणा समजून घेणारा व्यवसाय अभ्यासक्रम आहे, जो औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या विविध डिझाईन व हेल्थकेअरमध्ये उपयुक्त असतो.
६) सोलर टेक्निशियनः या व्यवसायामध्ये घर असो वा शेती त्यावर सौरऊर्जा प्रणाली उभारणे त्याची देखभाल करणे इत्यादी कौशल्ये शिकविली जातात. यामध्ये वीज निर्मिती आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रातील रोजगारास चालना देणारे कौशल्य प्राप्त होते.
७) सेमीकंडक्टर टेक्निशियन या अभ्यासक्रमात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, मायक्रो चिप तयार करणे, IC डिझाईन, क्लीनरूम सेफ्टी आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते.
या नवीन व्यवसायामुळे प्रशिक्षणार्थ्यांना केवळ नोकरी मिळण्याचाच मार्ग सुकर होत नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा व क्षमता देखील मिळते. ती पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल.
EV चार्जिंग स्टेशन/रिपेअरिंग गॅरेज सुरू करणे, ड्रोन सव्हें व कृषी सेवा, AI आधारित मोबाईल अॅप्स किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, 3D प्रिंटिंग स्टुडिओ/प्रोटोटायपिंग सेंटर, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन कंपनी, सेमीकंडक्टर उपकरणांचे सपोर्ट व सर्व्हिसिंग सेंटर
जागतिक औद्योगिक स्पर्धेत भारताला पुढे न्यायचे असेल, तर युवकांना पारंपरिक शिक्षणा पेक्षा कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे अधिक गरजेचे झाले आहे. खढख आता केवळ साधे ट्रेनिंग सेंटर राहले नसून, ते एक भविष्यनिर्माणाचे केंद्र बनले आहे जे नवनवीन रोजगार निर्माण करून नवा उद्योग उभारण्यासाठी उद्योजक घडवतो. आणि भारतासाठी आत्मनिर्भरतेच्या वाटा मोकळ्या करून देतो.
रविंद्र दांडगे
शिल्पनिदेशक, अंजनगाव सुर्जी
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments