आयटीआय अमरावती येथील ट्रॅक्टर मेकॅनिकल व्यवसायातील 10 प्रशिक्षणार्थ्यांची भारत सरकारच्या मशनरी ट्रेनिंगसाठी मध्यप्रदेश मध्ये निवड
संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथील ट्रॅक्टर मेकॅनिकच्या या व्यवसायातील सत्र 2024 -25 मधील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दहा प्रशिक्षणार्थ्यांचे भारत सरकारच्या सेंट्रल फॉर्म ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट बुदणी जिल्हा सिहोर मध्य प्रदेश येथे 45 दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता निवड झालेली आहे
या 45 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी मशनरी चालविणे व त्यांच्या दुरुस्तीचे कामे करणे सर्विसिंग करणे तसेच नवनवीन कृषी तंत्रज्ञान मधील अद्यावत मसीनरी ट्रेनिंग या प्रकारचे ट्रेनिंग भारत सरकारकडून दिल्या जाणार आहे या प्रशिक्षण दरम्यान जेवणाची राहण्याची विनामूल्य सुविधा असून दोनशे रुपये प्रमाणे प्रतिदिन मानधन दिल्या जाणार आहे.
तंत्रज्ञानानुसार शेती विषयक सर्व प्रकारच्या मशनरी हाताळणे, दुरुस्ती करणे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे हे ज्ञान संपादन करून आल्यानंतर त्यांना स्वयंरोजगार रोजगार करण्याकरिता मार्गदर्शन ठरणार आहे त्यांच्या निवडीसाठी त्यांचे प्रशिक्षित श्री मुकेश धुराट शिल्प निदेशक यांत्रिक कषित्र यांना जाते.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सौ. सुधा ठोंबरे मॅडम यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सह अभिनंदन केले आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments