आयटीआय पांढरकवडा येथे अल्पमुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमाचा शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग अंतर्गत वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षीय संस्था आदिवासी पांढरकवडा येथे अल्पमुद्यतेचे रोजगारक्षम कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेत दाखवण्यात आले.
तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांडवकडा येथील अल्पमुद्दीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन विश्वकर्मा लाभार्थी रामदास राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री राजेंद्र इंगळे तहसीलदार पांढरकवडा तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री गंगाधर आश्रम श्री रिखपचंद मुथा, सौ विशाखा विवेक काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेतील ज्येष्ठ शिल्पनेदेशक श्री एन के राठोड होते तारे श्री जी एस. पाटील गटनिदेशक यांचे प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री एन के राठोड यांनी केले.
या संस्थेमध्ये एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ अन स्किल विद्यार्थी आणि महिलांना होणार आहे. एकूण 210 प्रश्नार्थ्यांची ऑनलाईन निवड करण्यात आली असून त्यामध्ये 60 महिलांचा समावेश आहे.याप्रसंगी माननीय राजेंद्र इंगळे तहसीलदार यांनी अल्पमुदतीच्या प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर रिखपचंद मुथा, सौ विशाखा काळबांडे आणि श्री गंगाधर आत्रम यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली.
अल्पभूतीच्या उद्घाटन प्रसंगी आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच विश्वकर्मा लाभार्थी आणि निवड झालेले विद्यार्थी यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश देठे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम किशोर नारिंगे, सुधीर बनसोड ,किरण राठोड, शैलेश चव्हाण ,सचिन बोलतवार ,विशालअरगुलवार ,सुरज टापरे, कु. वैष्णवी कुबडे ,कु. मोनाली सेंगर ,कु. योगिता चव्हाण ,कु.दिपाली कोल्हे ,आकाश सोनोने , मुनीर शेख, दुर्योधन नरनावरे अनिल नवाथे, हमराज जेधे ,बबन कोवे, श्री विजय भंदीरगे, श्री मार्गदिप भाटशंकर, निलेश पिटठ्वार, सौ करूणा सुधीर बनसोड, पंकज लोणारे, अतुल जाधव, तसेच सर्व मेस्को कर्मचारी ,श्री मनोज पिन्मवार,यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.गणेश फुटाणे आभारप्रदर्शन यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने उद्घाटनाची सांगता करण्यात आले.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments