7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम सार्धशताब्दी पांढरकवडा येथे साजरी
बकिमचंद्र चॅटर्जी लिखित ऐतिहासिक वंदे मातरम गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव मित्र क्रीडा मंडळ प्रांगणात मुख्य समारोप पार पडले .यामध्ये स्थानिक शाळा ,कॉलेजेस आणि आयटीआय पांढरकवडा येथील विद्यार्थ्यांचा आपला सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्रालय यांच्या माध्यमातून शासकीय आयटीआय पांढरकवडाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. वंदे मातरम सामूहिक गीत गायनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगाधर आत्रम आयएमसी सदस्य होते .प्रमुख अतिथी म्हणून श्री रिकबचंद मुथ्था, उद्योजक तथा आयटीआय आयएमसी सदस्य, श्री राजू मोटेमवार तहसीलदार ,श्री सुनील कोपुलवार तालुका क्रीडा संयोजक , डॉ. श्री रमजान विराणी, श्री हनुमंत शिवण्या रजणलवार तसेच आयटीआय संस्थेचे प्राचार्य श्री विकास थोटे उपस्थित होते .तर प्रमुख वक्ता म्हणून सौ योगीनी डोळके ,संचालक बांबूसा कृषी पर्यटन केंद्र ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारत माता व बकिमचंद्र चटर्जी यांच्या पूजन करून करण्यात आले आयटीआय संस्थेच्या वतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक श्री विकास विश्वास थोटे आयटीआय प्राचार्य यांनी केले.
| प्रमुख वक्ता सौ. योगिनी डोळके मार्गदर्शन करताना |
सकाळी 9.50. मिनिटांनी वंदे मातरम सामूहिक गीत गायनाला प्रारंभ करण्यात आले. ह्या वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव करीता जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, श्री शारदा ज्ञानपीठ, महिला समाज के .ई.एस .कन्या शाळा, शाहू महाराज माध्यमिक शाळा ,मोघे कॉलेज ,बीडीपी कॉलेज ,सिटी इंग्लिश प्राइड स्कूल आणि आयटीआय मधील प्रशिक्षणार्थी यांचा समावेश होता. प्रमुख वक्ता सौ.योगिनी डोळके यांनी देश प्रेमाचे महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून मांडले.
वंदे मातरम महोत्सव निमित्ताने स्थानिक शाळा कॉलेजेस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात विजेत्त्यांयांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले .उच्च माध्यमिक स्तर प्रथम क्रमांक कु. आदिती विजय माहुर्ले श्री. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय ,द्वितीय क्रमांक कु.श्रुती राजू आगरकर श्री. शाहू महाराज आर्ट अँड सायन्स जुनिअर कॉलेज तर तृतीय क्रमांक आदित्य विजय खडसे १२ वी कला श्री. बाबासाहेब देशमुख पारेकर महाविद्यालय यांनी पटकाविले.
तर माध्यमिक स्तरातुन प्रथम क्रमांक यश अशोक सोनटक्के आयटीआय पांढरकवडा ,द्वितीय क्रमांक कु.विदिशा विनोद निकोडे नववा वर्ग जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, तर तृतीय क्रमांक तसेच काशिद शरद ऊईके वर्ग १० वा.के.ई .एस. कन्या शाळा यांना वंदे मातरम निबंध स्पर्धकरिता प्रमाणपत्र ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ त्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम एन. के .राठोड , श्री प्रदीप सोमनकर,किशोर नारींगे,सुधीर बनसोड ,माणिक केवटे, विजय भंदीरगे ,आकाश सोनवणे, गणेश फुटाणे ,गणेश देठे, किरण राठोड, शैलेश चव्हाण,दुर्योधन नारनवरे ,सौ.करुणा सुधीर बनसोड, कु. वैष्णवी कुबडे ,कु.मोनाली सेंगर ,योगिता चव्हाण ,पंकज लोणारे, अतुल जाधव ,हमराज जेधे ,लखन जेधे,बबन कोवे ,अनिल नवाथे , सुरज टापरे, विशाल अंगुलवार ,मार्गदिप भाटशंकर ,मुनीर शेख, हितेश भस्मे ,कु. अश्विनी वानोळे, सचिन बोलतवार ,रुपेश पवार, कु. वासनिक मॅडम,मदन दुग्गड यांनी केले.
वंदे मातरम सार्धशताब्दी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विशाखा काळबांडे यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्थानिक विविध आस्थापनातील अधिकारी , कर्मचारी वृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

0 Comments