Advertisement

आयटीआय यवतमाळ येथील फिटर ट्रेडच्या आलेश खंदरकर विद्यार्थ्याची दुबई येथे निवड

 आयटीआय यवतमाळ येथील फिटर ट्रेडच्या आलेश खंदरकर विद्यार्थ्याची दुबई येथे निवड

आयटीआय यवतमाळ येथील फिटर ट्रेडच्या आदेश खंदरकर विद्यार्थ्याची दुबई येथे निवड

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ (जिल्हा यवतमाळ) ही संस्था सन 1963 पासून कार्यरत असून, आजपर्यंत या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थ्यांनी देश-विदेशात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त केल्या आहेत. सन 1984 मध्ये देशातून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान या संस्थेने पटकावला असून, त्यामुळे आयटीआय यवतमाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे. विविध उपक्रम, कॅम्पस मुलाखती व रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे ही संस्था जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करून आहे.

या संस्थेतील फिटर ट्रेड मधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आलेश सोमेश्वर खंदरकर, रा. यवतमाळ यांची दुबई येथील नामांकित कंपनी ESAG येथे यशस्वी निवड झाली आहे.आलेश खंदारकर हे यवतमाळ येथील मोलमजुरी करणारे श्री. सोमेश्वर खंदारकर यांचे सुपुत्र असून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथेच पूर्ण केले. कौटुंबिक व आर्थिक परिस्थितीमुळे शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आयटीआय करण्याचा निर्णय घेतला आणि सन 2023 मध्ये आयटीआय यवतमाळ येथे फिटर व्यवसायात प्रवेश घेतला. जुलै 2025 मध्ये त्यांनी आयटीआय परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.

आयटीआय पूर्ण केल्यानंतर रोजगाराची गरज भासल्याने त्यांनी परदेशात नोकरी मिळविण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी मेहनतीने काम करून आवश्यक आर्थिक तयारी केली, व्हिसा व पासपोर्ट प्राप्त केला तसेच दुबई येथील कंपनीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर केला. मुंबई येथे झालेल्या मुलाखतीत त्यांनी यश संपादन केले आणि त्यांची दुबई येथे निवड झाली.

जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळा ठरत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.निवडीचे कॉल लेटर ई-मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे प्राचार्य श्री. विनोद नागोरे यांनी आलेश खंदरकर यांचे मनोबल वाढवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांचे व्यवसाय शिल्पनिदेशक श्री. संजय डवरे यांचेही अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आलेश आपल्या निवडीची श्रेय त्याचे आई-वडील आणि त्याचे प्रशिक्षण संजय डवरे संस्थेचे गटनिदेशक श्री नवरंगे सर आणि संस्थेचे प्राचार्य श्री. विनोद नागोरे यांना देत आहे संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि भरभरुन  कौतुक केले.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments