आयटीआय पांढरकवडा येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
पांढरकवडा येथील वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जी. एस. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. गंगाधर आत्राम (IMC सदस्य) उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. एन. के. राठोड यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. दिपाली कोल्हे मॅडम यांनी केले. यावेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी आपली सुरेख भाषणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यानंतर प्रमुख वक्ते श्री. गंगाधर आत्राम यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर व विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी आत्मविश्वास, शिस्त आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व समजून घ्यावे, असे सांगितले. आजच्या युवकांसाठी हे विचार अत्यंत महत्त्वाचे असून, आयटीआयमधील कौशल्य शिक्षणाबरोबरच चांगला माणूस बनणे, जबाबदार नागरिक होणे आणि देशासाठी काहीतरी करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या संस्कारांनी घडवले, त्याच संस्कारांची आज देशाला गरज आहे. शिस्त, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा हे गुण युवकांनी आपल्या जीवनात आत्मसात करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. एन. के. राठोड यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले,
“एकच विचार घ्या,
तोच विचार तुमचे जीवन बनवा,
त्याचे स्वप्न पहा,
त्याचाच विचार करा.”
या विचारांनी उपस्थित युवकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश देठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश फुटाणे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments