शासकीय आयटीआय तासगाव जिल्हा सांगली येथील सूर्यकांत आनंदा मिरजे वायरमन ट्रेड करून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या शिखरावर विराजमान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला नमस्कार तसेच आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन यशोगाथा. आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करू पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही फायदेमंद ठरणार आहे. तुमची इच्छा शक्ती आणि महत्वकांक्षा आणि ध्येय हे निश्चित तर असेल नक्कीच तुम्ही मोठ्या पदावर विराजमान झाल्याशिवाय राहत नाही हे आजच्या या यशोगाथा वरून तुम्हाला लक्षात येईल.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तासगाव जिल्हा सांगली येथे श्री. सूर्यकांत आनंदा मिरजे मु. शिंदेवाडी (हिंगणगाव )तालुका कवठेमहाकाल जिल्हा सांगली येथील रहिवासी असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील हा विद्यार्थी. दहावी मध्ये चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर पुढे काय करायचं? त्याच्या मनामध्ये अनेक कल्पना येत होत्या. उच्च शिक्षण शिकायचा तर पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न होता.
त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला तासगाव आयटीआय मधील वायरमन ट्रेड करण्याचा सल्ला दिला. निश्चितच दहावीमध्ये चांगले मार्क असल्यामुळे त्याला वायरमन ट्रेडला प्रवेश मिळाले. 1996 -1998 मध्ये आयटीआय तासगाव जिल्हा सांगली येथे त्याने यशस्वीरित्या वायरमन ट्रेड पास केले. सूर्यकांत ला आयटीआय वायरमन ट्रेडमध्ये 74 %गुण मिळाले. त्यानंतर सन 1999 ते 2001 मध्ये त्याने महावितरण 33 K.V.सबस्टेशन किर्लोस्करवाडी येथे मध्ये अप्रेंटीशीप केले त्यामध्ये सुद्धा त्याला 80 टक्के गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी बारावीला पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
आणि 2005 मध्ये विज सेवकाच्या जागा निघाल्या त्यामध्ये फार्म भरले परीक्षा दिली आणि मुलाखत दिली यामध्ये यश मिळाले आणि वीज सेवक महावितरण कंपनीत रुजू झाले.सूर्यकांत मिरजे यांचे प्रशिक्षक श्री विजय रघुनाथ चौगुले सर यांच्या मार्गदर्शनात नोकरी करीत असताना 2009 ते 2011 या वर्षात बेळगाव कर्नाटक मध्ये correspond diploma डिप्लोमा पूर्ण केले. त्यामध्ये यशस्वी होऊन महावितरणच्या कार्यालयात डिप्लोमा पुर्ण झाल्याचे सादर केले.
महावितरण मध्ये वीज सेवक पदावर काम करीत असताना ज्या गावांमध्ये काम करायचो त्या परिसरात विजेचा प्रश्न कधीच निर्माण होऊ दिला नाही. मनमिळावू आणि शांत स्वभावाचा असल्यामुळे ते परिसरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2007 मध्ये आपरेटर पदावर विराजमान झाले.
सूर्यकांत आनंदा मिरजे तसे दोघे भाऊ लहान भाऊ बारावीचे शिक्षण पूर्ण करून शेतीची कामे करतात. सुर्यकांत घरात मोठा असल्यामुळे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. ऑपरेटर पदावर काम करीत असताना महावितरण मध्ये काम करीत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन चालले, जनतेचे विजेचे प्रश्न सोडविणे, तसेच विजेचे अडचणी त्वरित करण्याचा त्यांचा मानस होते. त्यामुळे ते परिसरामध्ये लोकप्रिय होते.
सूर्यकांत आनंदा मिरजे हा आयटीआय वायरमन पास करून आज दिनांक १७ मार्च २०२२ रोजी महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता ह्या पदाच्या शिखरावर पोहोचले. ही बाब शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तासगाव जिल्हा सांगली यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तसेच आयटीआय वायरमन करुन महावितरण कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता पर्यंत पोहोचणारा हा पहिलाच विद्यार्थी आहे.
सूर्यकांत आनंदा मिरजे यांचे मूळ गाव शिंदेवाडी( हिंगणगाव) तालुका महाकवठेकाल जिल्हा सांगली आयटीआय पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. सुर्यकांत हा आयटीआय वायरमन पास करून कनिष्ठ अभियंता पदावर पोहोचल्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
सूर्यकांत आनंदा मिरजे त्याचे यशाचे श्रेय आई-वडील आणि मित्रपरिवार तसेच (शिल्पनिदेशक वायरमन) श्री.व्ही.आर. चौगुले सर, तसेच त्यावेळेचे संस्थेचे प्राचार्य श्री. बी. बी. पाटील यांना देत आहे.
सूर्यकांत आनंदा मिरजे यांचे महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता पदावर विराजमान झाल्याने त्यांना तासगाव आयटीआयचे प्राचार्य तसेच त्याचे प्रशिक्षक श्री व्ही.आर. चौगुले सर यांनी अभिनंदनसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संकलन व शब्दांकन
श्री. एन. के. राठोड (शिल्पनिदेशक )शासकीय आयटीआय आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments