आयटीआय पांढरकवडा येथील वायरमन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थी यांची वाऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना भेटी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी )पांढरकवडा येथील वायरमन ट्रेड च्या प्रशिक्षणार्थी यांची इंडस्ट्रियल व्हिजिट वाऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना अभ्यासक्रमाचे दृष्टिकोनातून दिनाक 11/11/2022 रोजी भेट दिली. हेटेरो मेड सोल्युशन प्रा. लि.ईसापुर सावरगाव बंगला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे 30 MW विज निर्मिती करणारा विंड एनर्जी कंपनी असून विदर्भातील ही एकमेव कंपनी आहेत.हेटेरो मेड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जगात १४६ देशात अशा प्रकल्पाचे प्रकल्पाचे जाळे पसरलेल्या आहेत.
या ठिकाणी 20 पवनचक्की असून याद्वारे ३३ मेगाकेव्हीचे वीज निर्मिती केला जाते. नियमित अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त या इंडस्ट्रीयल व्हीजीट मुळे प्रशिक्षणार्थींना त्यांच्या ज्ञानात भर पडते. अभ्यासक्रमानुसार वीज निर्मिती व वहन हा पाठ्यक्रम त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आलेले आहे.
वीज निर्मिती बाबत हेटेरो मेड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अभियंता मा. मनिदीप सी. सर, श्री. कृष्णा जी .अभियंता, तसेच सहायक अभियंता श्री उमेश कडूकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मोलाची माहिती दिली.आणि आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांची अभ्यासक्रम दौरा इंडस्ट्रियल व्हिजिट विदर्भातून प्रथमच पहिली आयटीआय असल्याचे मत कंपनीचे अभियंता त्यांनी व्यक्त केले.
या अभ्यासक्रम दौऱ्यामध्ये वायरमन ट्रेडच्या कनिष्ठ बॅच आणि वरिष्ठ बॅच मिळुन 33 प्रशिक्षणार्थी यांनी याचा लाभ घेतला श्री .एन.के. राठोड शिल्प निदेशक आयटीआय पांढरकवडा यांनी हेटेरो मेड सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अभियंतांचे आभार मानले. या इंडस्ट्रियल व्हिजिटला संस्थेचे प्राचार्य श्री राहुल पळवेकर यांनी अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments