Advertisement

आयटीआय अमरावती येथील जनरल पेंटर ट्रेडच्या दोन प्रशिक्षणार्थीची डॉक यार्ड मुंबई येथे टेक्निशियन पदासाठी निवड.भारतातून ओबीसी प्रवर्गामधून मयूर पडांगळे हा प्रथम तर मंगेश रोंघे सातवा

आयटीआय अमरावती येथील जनरल पेंटर ट्रेडच्या  दोन प्रशिक्षणार्थीची डॉक यार्ड मुंबई येथे टेक्निशियन पदासाठी निवड.भारतातून ओबीसी प्रवर्गामधून मयूर पडांगळे हा प्रथम तर मंगेश रोंघे सातवा

आयटीआय अमरावती येथील जनरल पेंटर ट्रेडच्या  दोन प्रशिक्षणार्थीची डॉक यार्ड मुंबई येथे टेक्निशियन पदासाठी निवड.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर यशोगाथा लिहिताना अतिशय आनंद होत आहे. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांवर लिहिताना वेळ कमी पडतो. खूप विद्यार्थ्यांची यशोगाथा आहे. जेव्हा की भारतात नव्हे तर संपूर्ण जगात आयटीआय पास झालेल्या विद्यार्थी पसरलेला आहे. त्यांना फोकस करणे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांच्यापासून नवीन पिढी प्रेरणा घेऊन. आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जोश निर्माण होऊ शकतो. आयटीआय करणारा विद्यार्थी हम किसीसे कम नही. असा म्हणू शकतो. कारण खरं कसोटीवर आयटीआयचा विद्यार्थी असतो.

आज  आपण जाणून घेणार आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावती जिल्हा अमरावती येथील जनरल पेंटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थी यशस्वी वाटचाल विषयावर.मयूर मोरेश्वर पडांगळे मुक्काम टेंभुर्खेडा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील येथील रहिवासी असून त्याचे एमसीव्हीसी बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. खर तर त्याला पेंटर कामाची आवड होती. त्यामुळेच बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आयटीआय अमरावती येथे पेंटर ट्रेड साठी अर्ज टाकला होता. आणि सन 2013 ऑगस्ट मध्ये त्याला आयटीआय मध्ये प्रवेश मिळाले.

 जनरल  पेंटर ट्रेड हा दोन वर्षाचा ट्रेड असून जुलै 2015 मध्ये त्याने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले . आयटीआय पास झाल्यानंतर पुढचा प्रशिक्षण असतो शिकवू उमेदवारीचा म्हणजेच अप्रेंटीशीप हा 1961 चा कायदा असल्यामुळे आयटीआय पास झाल्यानंतर अप्रेंटीशीप करणे बंधनकारक असते. त्यामुळे त्यांनी सतत धडपड केली. आणि भारत सरकारच्या डाक्यार्ड मुंबई येथे अप्रेंटीशिप करीता अर्ज केला. आणि 2016 -17 दरम्यान त्याचे डॉक्यार्ड मध्ये अप्रेंटीशीप पूर्ण झाले. 

मयूर मोरेश्वर पडांगळे हा शेतकरी कुटुंबातील असून त्याला तीन बहिणी आणि मयूर असा त्यांचा परिवार मयूरचा एकच ध्यास नौकरी करायची म्हणजेच करायची. शेवटी डॉक यार्ड यामध्ये टेक्निशियन पदाकरिता जागा निघाली आणि ऑफलाईन अर्ज केला. तर संपूर्ण ओबीसी प्रवर्गामधून मयूर हा प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाला. लिस्टमध्ये नाव धडकताच मयूरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या टेंभुर्खेडा मध्ये कुटुंबामध्ये दिवाळी सणासारखा वाटू लागला. 

कारण मयूरला केंद्र सरकारच्या  डॉक्यार्ड मध्ये नोकरी लागली होती. मयूरच्या वडिलांनी गावात पेढे वाटून आनंद साजरा केला. आणि मयूरला ऑर्डर धडकली. दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी तो डॉक यार्डमध्ये रुजूवात होईल.त्याला नियमित मार्गदर्शन त्याचे व्यवसाय शिल्पनिदेशक श्री. अनिल खडसे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे मयूर हा त्याच्या यशाची श्रेय त्याचे आई-वडील आणि श्री.अनिल खडसे सर यांना देत आहे. तसेच त्यावेळचे प्राचार्य श्री बहाड साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.


मंगेश बाळासाहेब रोंघे मु.कळमगव्हान .ता.भातकुली जिल्हा अमरावती नितीन रहिवासी असून त्याचे बी.ए .पर्यंत शिवाजी कॉलेज अमरावती मध्ये शिक्षण झालेला आहे. त्याला आयटीआय मध्ये फिटर किंवा इलेक्ट्रिशियन करायची फार इच्छा होती. परंतु त्याला जनरल पेंटरट्रेडमध्ये प्रवेश मिळाले. त्याने 2012 2014 मध्ये आयटीआयतील पेंटर ट्रेड 80 टक्के गुण मिळवून पूर्ण केला. 2015 -16 मध्येच डॉक्कयार्डमध्ये अप्रेंटीशीप पूर्ण केले. 

डाकयार्ड मध्ये जागा निघाल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी त्याचे व्यवसाय निदेशक यांनी फार्म भरण्यासाठी मार्गदर्शन केले. आणि ती परीक्षा देऊन यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. मयूर हा भारतातून ओबीसी मधून पहिला तर मंगेश हा ओबीसीतून भारतातून सातवा क्रमांक घेऊन मिरीट लिस्ट मध्ये स्थान मिळवले. 

मंगेश आणि त्याचा लहान भाऊ रितेश रोंघे दोघेही आयटीआय अमरावतीमध्ये पेंटर ट्रेड केलेला आहे.त्याचे लहान भाऊ इंडिया स्कील सेंटर मध्ये जाॅब करीत आहे.म़ंगेशचे वडील सन 2017 मध्ये मयत झालेले आहे. कुटुंबाचे संपूर्ण जबाबदारी ही मंगेश वर आहे. भारत सरकारच्या डाॅकयार्ड मुंबई मध्ये नोकरी मिळाल्याने मंगेशच्या आईला अतिशय आनंद झाला आहे.

मंगेश रोंघे हा आपल्या यशाची श्रेय त्यांचे आई आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल खडसे सर, गटनिदेशक सतीश आवारे सर, यांना देत आहेत.मयूर आणि मंगेश एकाच व्यवसायातील आणि एकच आयटीआयतील अमरावती येथील असून आयटीआय मुळे त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळाला असे मत व्यक्त केले आहे.

 त्यांचे निवडीमुळे सध्याचे प्राचार्य श्री बोरकर साहेब, तसेच 

श्री.प्रदीप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी निवड झालेले प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे निदेशक यांना शुभेच्छासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
Kamache hireee ahet he 2 ni ( painter )