Advertisement

आयटीआय यांत्रिक मोटार गाडी ट्रेड पास असलेल्या 24 प्रशिक्षणार्थी यांचे जपानमध्ये एक लाख पेक्षा जास्त वेतनावर करीअर सुरू करणार

आयटीआय यांत्रिक मोटार गाडी ट्रेड पास असलेल्या 24 प्रशिक्षणार्थी यांचे जपानमध्ये एक लाख पेक्षा जास्त वेतनावर करीअर सुरू करणार

आयटीआय यांत्रिक मोटार गाडी ट्रेड पास असलेल्या 24 प्रशिक्षणार्थी यांचे जपानमध्ये एक लाख पेक्षा जास्त वेतनावर करीअर सुरू करणार

राज्यभरातील आयटीआय मधून मोटर मेकॅनिकल हा ट्रेड पूर्ण केलेल्या तब्बल 24 विद्यार्थ्यांना जपान मधील एका कंपनीने महिना एक लाख आणि त्याहून अधिक रुपयांच्या वेतनाची ऑफर दिली आहे.त्यामुळे हे विद्यार्थी देशाबाहेर आणि तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जापान या देशात आपले करिअर सुरू करणार आहेत.

देशातील आयआयटी आणि मोठ्या नामांकित व्यवस्थापन संस्थांच्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या नोकरीच्या ऑफर चर्चेत असतात, मात्र राज्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थीं आता मागे राहिले नाहीत, पहिल्यांदाच आयटीआय मधून मोटार मेकॅनिक चा ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना महिना एक लाख आणि त्याहून अधिक रुपयांचे पॅकेज जापान मधील एका नांमकित कंपनीकडून मिळाले आहे.

भारत सरकार व जपान देशामध्ये मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कौशल्य वृद्धी कार्यक्रमासाठी संयुक्त करार करण्यात आला होता.यामार्फत टेक्नीकल इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम (टी. आय. टी.पी) जपानमध्ये तीन ते पाच वर्ष कालावधीच्या राबविण्यात येणार आहे. या कालावधीत उमेदवारांना भारतीय चलनात रु. १ लाख प्रति महिना वेतन सुद्धा मिळणार आहे.

राज्यातील आयटीआय मधून मोटार मेकॅनिक हा ट्रेड पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याना अशा प्रकारे पहिल्यांदा संधी मिळाली असली तरी ही पहिली बॅच आहे. त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये आणखी १०० विद्यार्थ्याना संधी मिळाली असून तेही मोठ्या अभिमानाने लवकरच आपले करियर जापान मधून करणार असल्याने राज्यातील आयटीआय मधील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काम करण्याचा अनुभव, उच्च तंत्रज्ञान व काम करण्याची क्षमता वाढवून पर्यायाने रोजगारक्षमता वाढवून त्यांना एक नवीन दिशा लाभणार आहे. या पार्श्वभूमीवर २ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्यातील जापान मध्ये करिअर साठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम मुलाखती आयटीआय ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते. या मुलाखती नॅशनल स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशन यांनी नामनिर्देशित केलेल्या ओरीयन सशी व केन मेंटर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या असून यासाठी जपान मधील उद्योजक अलि ओन व ओव्हरसीज असोसिएशनचे संचालक क्योझावो शिनिचीओ हे उपस्थित होते.

आतापर्यत टेक्नीकल इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम या योजनेमार्फत महाराष्ट्रातील आयटीआयतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यां नोंदणी केलेली आहे. पुढील वर्षअखेर ५०० विद्यार्थ्यांना जपानमध्ये पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी लिओ अँड सॅग्रीटरिअस आणि केन मेंटर्स या कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कवी लुथ्रा यांनीही स्वागत केले आहे.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments