Advertisement

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत आयटीआय अमरावती येथील सिद्धांत मोडक यांनी सुवर्णपदक पटकाविला आणि पुढील जागतिक कौशल्या स्पर्धा फ्रान्समध्ये त्याची निवड

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत आयटीआय अमरावती येथील सिद्धांत मोडक यांनी सुवर्णपदक पटकाविला आणि पुढील जागतिक कौशल्या स्पर्धा फ्रान्समध्ये त्याची निवड

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत आयटीआय अमरावती येथील सिद्धांत मोडक यांनी सुवर्णपदक पटकाविला आणि पुढील जागतिक कौशल्या स्पर्धा फ्रान्समध्ये त्याची निवड
सिद्धांत मोडक त्यांच्या मातोश्री सह स्मृतिचिन्ह देऊन गौरव करताना जिल्हाधिकारी श्री.सौरभ कटियार आणि प्रांजली बारस्कर सहाय्यक आयुक्त अमरावती 

"जुनून है जहान मे तो हौसले तलाश करो 

बहते हुए पानी की तरह  रास्ते तलाश करो

ये बेचैनी रगो में बहुत जरुरी है दोस्तो

उठो सफर के नये सिलसिले तलाश करो!

दिनांक 19 व 20 मार्च 2024 रोजी भारतीय उद्योग महासंघ (CIT)राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दान बॉस्को सेंटर फॉर लर्निंग मुंबई राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सिद्धांत मोडक यांनी आयटीआय अमरावती ते MMTC हा ट्रेड केलेला असून वीस वर्षाच्या तारुण्यात कोरोना काळात पितृछत्र हरवलेला आहे आई घरकाम करीत असून हा वेगळे स्वप्न रंगवत आहे आणि त्याच्या या स्वप्नांना मृर्त स्वरूप मिळवण्याची सुरुवात आता झालेली दिसून येत आहे .सिद्धांत अमरावती येथील रहिवासी असून सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्समधील लिओने ते आयोजित अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जागतिक कौशल्या स्पर्धा 2024 या कार्यक्रमातून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून इंजिनिअरिंग कॉलेजेस ,पॉलिटेक्निक ,आयटीआय मधील स्पर्धकाने सहभाग घेतला होता परंतु अमरावतीतून राज्यस्तरीय पात्रता आपली सिद्धांत मोडक यांनी पेंटिंग अँड डेकोरेटिंग या कौशल्य प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याने अमरावती जिल्ह्याचे आणि अमरावती जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या मातोश्री सह स्मृतिचिन्ह देऊन त्याचा गौरव केला तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्वतःच्या हिमतीवर मेहनतीच्या जोरावर तो महाराष्ट्रातून पहिला आला आणि राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव लौकिक करून आयटीआय ची फ्रान्समध्ये भारताची प्रतिनिधित्व करणार आहे.  प्रांजली बारस्कर सहाय्यक आयुक्त अमरावती यांनी सिद्धांत मोडक ला पुष्पगुच्छ देऊन त्याचा कौतुक केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

श्री प्रदीप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी सिद्धांत मोडक याला याचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रांजली बारस्कर,

सहा.आयूक्त,

जि.कौ.वि.रो.व उ.मा.केंद्र,अमरावती

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments