मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल प्रशिक्षण युवकांना मिळणार विद्यावेतन -सुहास गाडे सहायक उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी
पांढरकवडा -महसूल वन विभाग तसेच कौशल ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा निमित्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे श्री.गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक सुहास गाडे साहेब होते.तर मार्गदर्शक श्री राजेंद्र इंगळे तहसीलदार केळापूर तसेच अनिल देशटी्वार, प्रदीप सोमनकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
मा.सुभाष गाडे सहाय्यक उपजिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री युवा कार्य योजना बाबत उपस्थित आयटीआय प्रशिक्षणार्थी त्यांना विस्तृत माहिती देताना यामध्ये विद्यार्थी पात्रता निकष मध्ये लाभार्थ्याचे वय किमान 18 ते कमाल 35 वर्ष असावे. किमान शिक्षण बारावी पास, आयटीआय/ डिप्लोमा पदवीधर/ पदव्युत्तर ,महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता बारावी 6000 विद्यावेतन प्रति महा,आयटीआय/ डिप्लोमा 8000 ,पदवीधर पदव्युत्तर 10000 विद्या वेतन मिळणार असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आणि महास्वयम संकेतस्थळावर नोकरी इच्छुक म्हणून नोंदणी करण्यासाठी. www.rojgar.maha swayam.gov.in ह्या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी आव्हान केले.
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
तर मा.राजेंद्र इंगळे तहसीलदार केळापूर यांनी महसूल दिनानिमित्त देशात महसूल खात्याचे योगदान आणि महसूल विभागाचे कार्याचे गुणगौरव केले आणि विद्यार्थ्यांना बसल्या जागेवर जातीचे दाखले ,उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलीअर यासारखे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बाबत महास्वयम पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कसे करावी आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध स्थापना वर रोजगार मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज बाबत माहिती समन्वय श्री.एन.के.राठोड यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम गणेश फुटाणे ,आकाश सोनवणे, शैलेश चव्हाण, मार्गदिफ भाटशंकर, कु.मोनाली सेंगर, कुंडलिक आत्राम ,कु.वैष्णवी कुबडे, ज्ञानेश्वर आत्राम,सचिन बोरतवार, सुरज टापरे विशाल अलगुलवार ,हमराज जेधे ,निलेश पिट्लवार,यांनी केले .तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन के राठोड यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री किरण राठोड यांनी केले याप्रसंगी संस्थेतील बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments